नितीन देसाई यांचे पार्थिव आज त्यांच्याच एनडी स्टुडिओमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. स्टुडिओत असलेल्या जोधा अकबराच्या सेटवर नितीन देसाई यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. संध्याकाळी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान उदयनराजे भोसले यांनी काही वेळापूर्वीच अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. तर स्टुडिओतील सर्व कर्मचाऱ्यांना लाडक्या दादांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले होते. नितीन देसाई यांच्यावर तिथल्या गावकऱ्यांचे अतोनात प्रेम होते. गावच्या अनेक लोकांना त्यांनी हाताला काम मिळवून दिले होते. त्यामुळे दादांना निरोप देताना अख्खं गाव हळहळ व्यक्त करत आहे. नितीन देसाई आज अनंतात विलीन झाले सोबतच त्यांना…
Read More