ST Bus Empolyes Union strike in Maharashtra
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकार दुपारपर्यंत अध्यादेश काढणार आहे. ज्यात या संपाबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करून या मुद्यावर चर्चा करू अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. न्यायालय जो आदेश देईल त्याचे पालन करू, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. आज राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विविध एसटी स्थानकातली वाहतूक ठप्प आहे. बहुतांश आगारात कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी एसटी ठप्प आहे. राज्यभरातील तब्बल २२० डेपो बंद आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.ST Bus Empolyes Union strike in Maharashtra
दरम्यान, आज सकाळी १०.३० वाजता न्यायमूर्ती एस. काथावाला यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी जी समिती नेमण्यात येणार आहे त्यात राज्याचे मुख्य सचिव, अर्थ आणि परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांचा समावेश असेल. ही समिती ताबडतोब स्थापन करून तातडीनं त्यांची पहिली बैठक दुपारी ४ वाजेपर्यंत घ्या, आणि या बैठकीचे तपशील संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हायकोर्टात सादर करा असे आदेश दिलेत.
यावर अनिल परब म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार ही एक समिती स्थापन करण्यात येईल. मुख्यसचिव, परिवहन सचिव, फायनान्स सेक्रेटरी यांच्या अधिपत्याखाली त्रिसदस्यीय समिती असेल. त्याचा जीआर काढण्यात येईल. विलनीकरण केल्यास सरकारच्या तिजोरीवर किती ताण पडेल याचा अभ्यास केला जाईल. विलीनीकरणाच्या एकूणच मागणीबाबत अभ्यास करून या समितीने आपला निर्णय सरकारला द्यायचा आहे, असं अनिल परब यांनी सांगितले. तसेच संप चिघळण्यापेक्षा त्यावर तोडगा काढण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानवर ड्रोन हल्ले, नऊ शहर बाधित, रडार सिस्टीम उध्वस्त- आंतकियोसे का बदला ऑपरेशन सिंदूर जारी है..!
- Operation Sindoor | टारगेट कसे सेट केले ऑपरेशन सिंदूर बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?
- Maharashtra Local Body Election| चार महिन्यात निवडणुका घ्या कोर्टाने सुनवले, स्थानिक स्वराज्य संस्थांत निवडणूकाचा धुराळा उडणार
- Cast Census In India | जात जनगणना म्हणजे काय आणि ती भारतासाठी का महत्त्वाची आहे?
- “दहशतवाद्यांना शस्त्रे कुठून, सेना तुमच्या नियंत्रणात नाही का?” पहलगाम हल्ल्यानंतर मोदींचे जुने भाषण क्लिप व्हायरल