Online Team | नांदेड दि. 19 :- आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दुर व्हावा. यासाठी जिल्ह्यात सन 2021 साठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्हयातील जास्तीतजास्त युवक-युवतींनी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा.
आधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक (02462) 251674 वर संपर्क साधवा. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://forms./ubnTcxhi43Ee4PLC6 लिंक वर जाऊन आपली माहिती भरुन नाव नोंदणी करता येणार आहे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींना जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, वैद्यकीय संस्था तसेच वीस पेक्षा अधिक बेडची सोय असणारी रुग्णालये या कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून सुचिबध्द होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत.
हे संपुर्ण प्रशिक्षण उमेदवारांना, लाभार्थ्यांना पुर्णपणे नि:शुल्क असुन सुचिबध्द प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाचे शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल, असेही प्रसिध्दीपत्रकात सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा
- अंजली बदनामिया यांनी माझ्यावर केलेले कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप खोटे धनंजय मुंडे यांचा पलटवारमार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी…
- Anjali Damania On Dhananjay Munde|धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री काळात मोठा भ्रष्टाचार, अव्वाच्या सव्वा किमतीला वस्तू खरेदी करून शासनाला 245 कोटींचा चुनाAnjali Damania On Dhananjay Munde| Big corruption during Dhananjay Munde’s agriculture minister, 245 crores lime to the government…
- Beed DPDC Meeting News | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठकजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार गुरुवारी सकाळी बीडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी परळी येथील राष्ट्रवादी कार्यालयात मंत्री…
- What is the Eighth Pay Commission? वेतन, भत्ते आणि पेन्शन लाभ मध्ये सुधारणाचा उद्देश आहे.आठवा वेतन आयोग म्हणजे काय? ८वा वेतन आयोग हा भारतातील एक प्रस्तावित आयोग आहे जो सर्व केंद्र सरकारी…