मुदखेड तालुक्यातील खत तथा बी बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची झाडाझडती युवा क्रांती दलाने घेतली. या प्रसंगी मुदखेड शहरातील विविध दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना तंबी देण्यात आली.
सध्याला कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या भयंकर परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड हतबल झालेला आहे. अशा बिकट परिस्थितीत देखील शहरातील खते आणि बी बियाणे यांचे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ठरवून दिलेल्या अधिकतर खुदरा मुल्यापेक्षाही जादा दराने खतांची विक्री करीत आहेत. तसेच दुसरीकडे दुकानांमध्ये माल उपलब्ध असूनसुद्धा माल नाही असे सांगून माल उपलब्ध करण्यासाठी जादा पैसे हे व्यापारी आकारत आहेत. म्हणजे मालाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. जर मालाची टंचाई आहे, तर जादा पैसे देताच माल कसा उपलब्ध होतो असा संतप्त सवाल संघटनेने व्यापाऱ्यांना केला आहे.
हे सर्व सर्रास चालू असताना प्रशासन मात्र साखर झोपेत आहे. या दोघांनाही जागे करण्यासाठी युवा क्रांती दलातर्फे आज सत्यशोधमोहीम राबवण्यात आली. यात शहरातील विविध दुकानात जाऊन उपलब्ध मालाची शहानिशा करण्यात आली असता व्यापाऱ्यांची लबाडी उघडी पडली. त्या सर्व व्यापाऱ्यांना धारेवर धरून चौकशी केली. व इथून पुढे देखील हे सर्व असेच चालू राहिल्यास व्यापाऱ्यांवर युवा क्रांती दल गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. असे निवेदन कृषी अधिकारी यांना दिले आहे. सदरील निवेदन देण्यास युवा क्रांती दलाचे सचिव प्रशांत पाटील मुंगल, ज्ञानेश्वर मगरे, नंदकिशोर पवार, शरद पवार, शिवम मगरे, महेश पवार, महेश पवार, शिवशंकर पेरके, चक्रधर कळणे, मनोज झमकडे, विकास कदम तसेच किसान युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.
- Rainfall महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा: हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट |Heavy rain warning in Maharashtra: Meteorological Department issues red and orange alertमुंबई, 27 मे 2025: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. … Read more
- Monsoon arrived in Maharashtra | आनंदाचे वातावरण; यावर्षी महाराष्ट्रात १२ दिवस आधीच मान्सून दाखलयावर्षी महाराष्ट्रात १२ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि आनंदाचे वातावरण आहे. [Atmosphere of joy; … Read more
- Pre-monsoon Rainfall Upadate | मान्सून पूर्व पावसाने रेकार्ड तोडले, पुढील चार दिवस २६ मे पर्यंत पावसाचा जोर कायमभारतीय हवामान विभागाने (IMD) 21-25 मे साठी महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण क्षेत्रातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २४ तासांत … Read more
- निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ तर्फे “मूठभर धान्य, घोटभर पाणी ” योजनेअंतर्गत माहूरमध्ये मातीच्या परळाचे वाटप.तीव्र उष्णतेमुळे मुक्या प्राण्यांना पक्षांना तहान भागविण्यासाठी मंडळाचा उपक्रम… Distribution of soil pellets in Mahur under the “Handful of Grain, A Glass of Water” scheme … Read more
- Rainfall Update| पुढील दोन दिवसात विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यताआज (मंगळवार, १३ मे) महाराष्ट्रातील विविध भागात पुढील २४ तासांत निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या काही तासांत, वाढ होण्याची शक्यता … Read more