सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; अडचणीत दिवसेंदिवस वाढ
मुंबई : गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांचा कोठडी मुक्का काही केल्या संपत नाहीये. गेल्या चार दिवसांपासून कोठडीत असलेले गुणरत्न सदावर्ते यांना आज त्यांची कोठडी संपल्याने कोर्टात हजर करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (St Worker Protest) केलेल्या आंदोलना प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. (Sadavarten was remanded in judicial custody for 14 days)
या आंदोलनानंर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. 8 एप्रिलला शरद पवारांची निवास्थान सिल्व्हर ओक येथे एसटी कर्मचाऱ्यांची चांगलेच आक्रमक आंदोलन केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलकांची बाजु कार्टात वकील गुणरत्न सदावर्ते मांड होते. आज सदावर्तेंना कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही बाजुने जोरदार युक्तीवाद करण्यात आला.
कोर्टात काय झालं?
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्तेंची सात दिवसांची कोठडी मागितली होती. तर या कोठडीची आता काहीही गरज नसल्याचा युक्तीवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला. गुणरत्न सादवर्ते यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्यावरही आता आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात जयश्री पाटील यांचाही सहभाग आहे, असे म्हणत सरकरी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाचे लक्ष वेधले. खासकरून एसटी कर्मचाऱ्यांकडून दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली गेली, असा आरोप करण्यात आलाय. तसेच ही रक्कम गोळा करण्यात जयश्री पाटील यांचा मोठा रोल असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाला संगितले आहे. दोन्ही बाजुच्या वकीलांनी यावेळी जोरदार युक्तीवाद करत एकमेकांची आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
जयश्री पाटील यांच्यावरही आरोप
आज पुण्यातून या आंदोलनाप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर नागपुरातील व्यक्तीचा शोध सुरू आहे. त्या व्यक्तेची नाव बाहेर उघड करण्यात आले नसले तरी, कोर्टासमोर पोलिसांच्या माध्यमातून हे नाव सांगण्यात आले आहे. लवकरच या व्यक्तीला अटक करू असा दावाही पोलिसांनी यावेळी कोर्टात केला आहे. अशी माहिती समोर आली आहे. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांना या माध्यमातून 80 लाख रुपये मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. तर हा तपास भरकटलेला आहे. यात पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही, असा युक्तीवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला आहे. तसेच जयश्री पाटील नाव यांचं नाव एफआयआरमध्ये कुठेच नाही तर त्यांना आरोपी म्हणता येणार नाही. तर त्यांना सहआरोपी करण्यात येणार नाही, असेही सांगण्यात आले.
==================================
- बीडमधील उमाकिरणचे अल्पवयीन विद्यार्थिनीवर वाईट किरण लैंगिक छळ विनयभंग, पालकांमध्ये संताप
- अंतराळात जाणारे दुसरे भारतीय शुभांशु शुक्ला कोण आहेत ?Axiom-4 मिशनसह अंतरिक्षात इतिहास रचणारे पहिले भारतीय
- महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; कोकण, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- शैक्षणिक दबावाचा बळी! नीट चाचणीत कमी गुण पडल्याने वडिलांनी मारहाण केली; बारावीची हुशार विद्यार्थिनी साधना भोसले हिचा मृत्यू
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच भेट दिलेला क्रोएशिया हा देश कुठे आहे? काय आहे त्याची ऐतिहासिक माहिती