मुंबई (वांद्रे) : हनुमान चालीसा पठणावरून निर्माण झालेल्या वाद शिगेला गेलेला काल आपल्याला पहायला मिळाला होता. त्यावर शिवसैनिकांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानावर गोंधळ घातला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याला काल पोलिसांनी अटक करुन गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आज वांद्रे कोर्टात सुनावणी झाली आहे. त्यामध्ये त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. Rana couple in judicial custody; What happened to the argument?
दरम्यान रिझवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्यांची बाजू न्यायालयात मांडली असून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलिसांकडून युक्तीवाद केला आहे. त्यानंतर वांद्रे कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Rana couple in judicial custody; What happened to the argument?)
राणांविरोधात दाखल केलेल्या एफआयआरचं वाचन सरकारी वकीलांनी कोर्टात केलं. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कलम १५३ ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची गरज असून त्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. हे आंदोलन करण्यामागे कुणाचा हात होता का याचा आम्हाला सखोल तपास करायचा असून त्यासाठी आम्हाला वेळ हवा असल्यामुळे सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी त्यांनी केली.
त्यानंतर रिझवान मर्चंट यांनी कोठडीची मागणी ही योग्य नाही म्हणत आक्षेप घेतला होता. कुणालाही अटक करण्यापूर्वी नोटीस देणं गरजेचं असतं असं त्यांनी बचाव करताना सांगितलं होतं. तसेच राणा दाम्पत्यांवर लावलेल्या कलमांवर आक्षेप त्यांनी घेतला असून आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी यांच्यावर कारवाई का केली असा सवाल त्यांनी युक्तीवाद करताना केला. त्यानंतर सरकारी वकिलांची सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आणि त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान काल मुख्यमंत्री यांच्या खासगी निवासस्थानाबाहोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्यांनी दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गोंधळ घातला होता. पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर पडण्यापासून रोखलं आणि काल सायंकाळी राणा दाम्पत्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर वाद निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज वांद्रे कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला असून रिझवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्यांची बाजू मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? विरोधकांचा त्याला का विरोध आहे?
- भारतात एप्रिल पासून आर्थिक क्षेत्रात मोठे बदल, कर सवलत बँक चार्जेस, पॅन,आधार आणि बरच काही वाचा सविस्तर तुमच्या फायद्याची गोष्ट
- Samagra Shiksha Contract Employee Regular |समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सरकारच्या आश्वासनाने स्थगित, तीन महिन्याच्या आत कायम करणार?
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागा
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणा