“पर्यावरणासाठी एकत्र या… निसर्गासाठी जगा!”- ज्ञानेश्वर कऱ्हाळे; राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन २०२५ — माहूर नगरीत हरित विचारांची पर्वणी
माहूर :- निसर्गाच्या कुशीत वसलेल्या माहूर नगरीत, पर्यावरण प्रेमींचा मेळा जमणार आहे.
पद्मभूषण आदरणीय डॉ अण्णासाहेब हजारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संमेलन अध्यक्ष सय्यद शब्बीर (मामु) यांच्या अध्यक्षतेखाली २६ व २७ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन २०२५ या हरित सोहळ्याची सुरुवात होत आहे. Come together for the environment… Live for nature! – Gyaneshwar Karhale; State Level Environment Conference 2025 — A Festival of Green Thoughts in Mahur City
या संमेलनाचे उद्घाटन मा.आ.भीमराव केराम यांच्या हस्ते होणार असून मा. श्री. राहुल कर्डिले (IAS, जिल्हाधिकारी, नांदेड), मेघना कावली IAS मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद नांदेड,मा. श्री. संदीप चव्हाण (विभागीय वनअधिकारी, नांदेड), झेनिथ चंद्रा दोन्तूला IAS , सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी किनवट,मा. श्री. केशव वाबळे (IFS, उपवनसरंक्षक, वनविभाग नांदेड), मा. श्री. सूर्यकांत शिंदे (उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नांदेड) यांसारखे पर्यावरणासाठी कार्यरत अधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक ज्ञानेश्वर कऱ्हाळे , सारनाथ लोणे यांनी दिली.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. गोपाळसिंग चौहान (संचालक, सी.टी.चिट्स प्रा. लि.) असून दोन दिवस चालणाऱ्या या पर्वात योग-प्राणायाम, नद्या व निसर्गाशी संवाद, जलपुरुषांचे अनुभव, विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद, वृक्षसंवर्धनाच्या नव्या संकल्पना यावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी सौ. संजना चेमटे-अडसुळ व मा. श्री. सूर्यकांत बोईनवाड यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
याच वेळी शिक्षण संचालक मा. श्री. गोविंद नांदेडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
परिसंवादाचे विषयही विचारप्रवर्तक —
“पर्यावरणाशी आत्मीय नातं, बदलत्या हवामानाची जाण आणि हरित जीवनाची शपथ”
असे या संमेलनाचे घोषवाक्य ठरले आहे.
संमेलनाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात होत असून संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्यात या सोहळ्याबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.
संमेलन संयोजन समितीत श्री. वनश्रीताई मोरे-गुणवरे, डॉ राम कदम,पद्माकर जगताप, डॉ अजय जाधव,जिल्हाध्यक्ष सारनाथ लोणे,राजीव आंबेकर, डॉ. राजेंद्र लोणे,मनोज किर्तने, राहुल ढवळे,पुंडलीक गर्जे,वर्षा कन्हाळे,शारदासुत खामणकर,सुरेश कोथळकर,राहुल ठाकरे,कैलास बोधने,शिवाजी कपाळे, बबन वानखेडे,मंगेश चाटे ,राहुल ठाकरे,रवी गायकवाड,प्रा संतोष शेणमारे,पुंडलिक गर्जे,आकाश कांबळे,फाल्गुनी उपरीकर,छाया लोणे,पद्माकर जगताप,सरफराज दोसाणी , संतोष शेणमारे रवि गायकवाड,मंगेश चाटे ,सुरेखा तळणकर ,शिवाजी कपाळे यांचा सहभाग असणार आहे.

