7 oxygen-giving life-giving trees
💁🏻♂️ भारतात सध्या कोविड-19 चा कहर सुरू आहे. ऑक्सीजन कमतरता अनेक रूग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. पृथ्वीवर ऑक्सीजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे मानली जातात. आपण त्या झाडांविषयी जाणून घेवूयात जी सर्वात जास्त ऑक्सिजन तयार करतात.
🌱 समस्त मानव, प्राणी तसेच पर्यावरणासाठी वरदान असणारी झाडे 7 oxygen-giving life-giving trees
१) पिंपळाचे झाड : सर्वसाधारणपणे झाडे दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बनडायऑक्साईड सोडतात. हे एकमेव असे झाड आहे जे दिवसातून पूर्ण २४ तास ऑक्सिजन देते Oxygen giving trees. प्राचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते. तथागत गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली यामुळे याला बोधिवृक्षही म्हणतात. या व्यतिरिक्त या झाडांची पाने औषधी गुणांनी भरलेली आहेत.
२) अशोकाचे झाड : अशोक वृक्ष संपूर्ण भारतीय उपखंडात आढळतात. विविध प्रकारच्या आजाराला हे झाड उपयोगी असून, ते निरनिराळ्या आजाराचा नायनाट करते. सर्वात जास्त ऑक्सिजन सोडणाऱ्या झाडांमध्ये अशोकाच्या झाडाचाही समावेश होतो Oxygen giving trees. त्यामुळे ही झाडे आपल्याला जास्त करुन घर किंवा कार्यालयासमोर, विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
३) वडाचे झाड : वडाच्या झाडाला अक्षयवृक्षही म्हणतात. अक्षय्य म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे. वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही. ते कायम वाढतच राहते. वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडत असते Oxygen giving trees. भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते. वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात.
४) बांबूचे झाड : बांबूचे झाड सर्वात लवकर वाढणारे झाड आहे. बांबूचे झाड हवा फ्रेश करण्यासाठीही फायदेशीर ठरते Oxygen giving trees. इतर झाडांच्या तुलनेत बांबूचे झाड ३० टक्के अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार करते.
५) तुळशीचे झाड : प्रदूषणमुक्त हवा देणाऱ्या तुळशीचे झाड प्रत्येक ठिकाणी लावणे गरजेचे असते. प्रदूषणाचा स्तर साधारण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात तुळस मदत करते Oxygen giving trees. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते.
६) कडुनिंब : या वृक्षात त्याच्या परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे Oxygen giving trees. या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात. या झाडाचे पान, फळ, फुल, साल, खोड आणि काडया सर्व काही औषधी आहेत.
७) उंबराचे झाड : हे झाड खूप मोठे असते. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. उंबराचे झाड हे हवा शुद्ध करते Oxygen giving trees. तसेच या झाडाच्या सावलीत गारवा व शांतता मिळते.
🍃 या झाडांसोबतच जांभळाचे झाड, चिंचेचे झाड, आंबा, बकुळ, जास्वंद, सीताफळ, निवडुंगाचे, पेरू आदी झाडे हि आपल्यासाठी जीवनदायी वृक्ष आहेत.
खालील आरोग्या विषय लेख वाचा —————————————-
- शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर | After the oath-taking ceremony, Chief Minister Devendra Fadnavis’ first signature is on the medical aid file.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Kalmegh Ayurvedic Plant| कलमेघ बहुउद्देशीय आयुर्वेदिक वनस्पतीची ओळख; यकृत, अँटिऑक्सिडेंट, पचनशक्ती
- उन्हाळ्यात हाडांच्या मजबूती साठी हे पदार्थ खा भरपूर कॅल्शियम मिळवा