9 वे पर्यावरण संमेलन 2025 ला नांदेड जिल्हाधिकारी यांची उपस्थिती लाभणार; जिल्हाधिकारी यांना पर्यावरण मंडळाच्या वतीने निमंत्रण
Nanded District Collector To Attend 9th Environment Conference 2025 Invited By Nisarga Samajik Paryavaran Nivaran Mandal
माहुर प्रतिनिधी:- नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांची भेट घेऊन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे 9 वे पर्यावरण संमेलन 2025 चे आयोजन शक्तिपीठ माहूरगड येथे दिनांक 27 व 28 ऑक्टोबर 2025 संपन्न होणार आहे या संमेलनाचे प्रमुख उद्घाटक म्हणून *जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब * यांना निमंत्रित करण्यात आले आहे . Nanded District Collector to be present at 9th Environment Conference 2025; District Collector invited by Nisarga Samajik Paryavaran Nivaran Mandal
यावेळी राहुल कर्डीले साहेब यांनी सकारात्मक चर्चा करून पर्यावरणाचे काम अतिशय उत्साहाने आपले सर्व मंडळ करत आहे अशी शाबासकीची थाप दिली आणि मी पर्यावरण संमेलनास उपस्थित राहील अशी ग्वाही दिली त्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेब यांचे पर्यावरण मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले .
यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद दादा मोरे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे,उपाध्यक्ष प्रकाश केदारी, सचिव डॉ. अनिल लोखंडे, प्रसिद्धीप्रमुख महेश पाडेकर, नांदेड जिल्हाध्यक्ष सारनाथ लोणे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कपाळे , किनवट तालुका अध्यक्ष बबन वानखेडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Nanded District Collector To Attend 9th Environment Conference 2025 Invited By Nisarga Samajik Paryavaran Nivaran Mandal