MLA Anil Babar, the architect of the Tembhu scheme, passed away शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज सकाळी (31 जानेवारी) आकस्मिक निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणात हळहळ व्यक्त केली जात आहे. अलीकडेच त्यांनी सांगली येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शरद पवारदेखील उपस्थित होते. अनिल बाबर येथे येताच त्यांना जयंत पाटील यांनी बसण्यासाठी जागा दिली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकारणातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. Anil Babar Passed Away
‘पाणीदार आमदार’ म्हणून प्रचलित MLA Anil Babar, the architect of the Tembhu scheme, passed away
पश्चिम महाराष्ट्रात आमदार अनिल बाबर (Anil Babar passed away) यांना ‘पाणीदार आमदार’ म्हणून ओळखले जाई. खानापूर-आटपाडी येथे पाण्याची कायमच टंचाई होती. जायकवाडी प्रकल्पातून या भागाला पाणी देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून त्यांनी प्रयत्न केले. पुढे या योजनेला ‘ टेंभू योजना’ असे नाव देण्यात आले. सांगली जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे ते एकमेव आमदार होते. एकनाथ शिंदे यांच्या ते कायम जवळचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वच राजकीय पक्षाकडून शोक व्यक्त केला जात आहे. Anil Babar Passed Away
अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास – Anil Babar Poltical Journy
7 जानेवारी 1950 रोजी आमदार अनिल बाबर (Anil Babar passed away) यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षीच म्हणजेच 1972 साली राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे सदस्य बनल्यानंतर ते आमदार झाले. 1990 साली अनिल बाबर आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले होते. यासोबतच त्यांनी 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष पदही भूषविले. 1990 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकत विधानसभेत प्रवेश केला.पुढे 2014 आणि 2019 अशा सलग दोन विधानसभा निवडणूकही त्यांनी जिंकल्या. यासोबतच त्यांनी साखर कारखाने आणि जिल्हा बँकमध्येही पद भूषविले.