Maratha Reservation मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समिती (MMASS) स्थापना…!

Maratha Reservation मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समिती (MMASS) स्थापना…!

मुख्य संयोजकपदी प्राचार्य प्रदीपदादा सोळुंके यांची निवड झाली.
मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षण प्रश्नावर Maratha Reservation स्वतंत्र संघर्ष करण्याचा निर्णय झाला.

1 मे 1960 ला मराठवाडा विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. ज्या आंध्रप्रदेशातून मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. त्या आंध्रप्रदेश, कर्नाटक मधील मराठे OBC त आहेत. मग मराठवाड्यातील मराठयांचा समावेश OBC त का नाही ? या वर मार्ग काढण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आज मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीची स्थापना होऊन एकमुखाने महाराष्ट्राचे ख्यातनाम वक्ते प्रदीपदादा सोळुंके (लेखक,वक्ते, विचारवंत) यांची मूख्य संयोजकपदी निवड करण्यात आली.


अपवाद सोडला तर महाराष्ट्रातील सर्व विभागातील मराठयांचा OBC मध्ये समावेश झालेला आहे. मग मराठवाड्यातील मराठयांचा OBC त समावेश का नाही ? यावर औरंगाबाद येथे “जिजाऊ मंदिर” येथे सविस्तर चर्चा होवून, मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आपणच सोडवायचा. तसेच यासाठी न्यायालयीन तसेच रस्तावरील लढाई लढण्याचा या बैठकीत एकमुखाने निर्णय झाला. या प्रसंगी “एकच मिशन, मराठा OBC करण” अशा घोषणा ही देण्यात आल्या.

या संदर्भात जनजागृती करण्यासाठी 6 जून 2021 “शिवराज्याभिषेक” दिनापासून मराठवाडा दौरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला.


कोविडचे नियम पाळून घेण्यात आलेल्या या बैठकीस Adv. गजानन कदम, Adv. गणेश शिंदे, Adv. महेश मुठाळ, Adv. राहुल मस्के, डॉ. रामकीशन पवार, श्री. किशोरभाऊ चव्हाण, प्रा.धनंजय पाटील, रमेश गायकवाड, प्रशांत इंगळे, भागवत काकडे, भगवान वाकडे, पद्माकर देशमुख, गणपतराव जगताप, माणिकराव देशमुख, सुधाकर गायकवाड, अशोक सोळंके, स्वप्नील घुमरे, वैभव बोडखे, अमोल फडके, बद्रीनाथ खरात, कबीर घुमरे, संकेत , अक्षय , शुभम सोळंके इ मान्यवर उपस्थित होते,
या बैठकीचे सूत्रसंचालन वैभव बोडखे यांनी, तर आभार स्वप्नील घुमरे यांनी मानले.


एकच मिशन मराठा -ओबीसीकरण…
मराठा आरक्षण…!

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice