मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जरांगे यांनी १७ दिवसानंतर उपोषण मागे घेतले आहे. एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर व दोन सरकारी अधिकारी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. Manoj Jarange Maratha reservation movement stopped on 17th day; The hunger strike at the hands of Chief Minister Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द आहे, कुणावरही अन्याय न करता आम्ही ते देणार. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मनोज सारखं स्वस्थ बसणार नाही.मराठा समाज आणि सरकार काही वेगळं नाही. प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं, माझे बाबा गावाला असताना तयारी करत होते. तेही मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत असतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मनोज जरांगेंचा हेतू प्रामाणिक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हेतू प्रामाणिक असला की जनता प्रमाणिकपणे मागे उभी राहते. त्यामुळे सर्वांनी जरांगेना पाठिंबा दिला. मी त्यांना उपोषण सोडण्याची मागणी केली. त्यांनी माझ्याहातून सरबत घेतले त्याबद्द मी आभारी आहे. Manoj Jarange Maratha reservation movement stopped on 17th day; The hunger strike at the hands of Chief Minister Eknath Shinde
शासनाची भूमिका काय?
शासनाची भूमिका स्पष्ट आहे. सरकारने याआधी मराठा समाजाला १६ आणि १७ टक्के आरक्षण दिलं होतं. पण सुप्रिम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द झालं. जेव्हा आरक्षण रद्द झालं त्यावेळी ३७०० मुलांच्या मुलाखती झालं होत्या, त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडसं आम्ही केलं. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठ्यांना देण्याचं काम आम्ही केलं. पण रद्द झालेलं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे, अशी भूमिका सरकारची सुद्धा आहे, असे शिंदे म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले?
आम्हाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही. सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचे आभार, सन्मानही करतो. आरक्षण हा तुमच्या आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला न्याय देतील. मराठा समाजाला तुमच्याविषयी आशा खूप आहे, धाडसी निर्णय घेण्याची क्षणात फक्त एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. मराठा समाजाच्या निर्णयाशिवाय इतर निर्णय सुद्धा शिंदे यांनी धाडसांनी घेतले.ते आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत.
मी तुम्हाला शब्द दिला त्याप्रमाणे मी वागणार, तुमच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यांनी एका महिन्याचा वेळ मागितला. मी सगळ्या समाजाला विश्वासात घेतले. ५० हजारापेक्षा जास्त लोकं उपस्थित होते. मी लोकांशी चर्चा करून सरकारला एका महिन्याचा वेळ दिला.तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचे वाटोळे करू नका, आम्ही तसले धंदे करत नाहीत. आम्हाला आरक्षणाशिवाय काही मागणी नाही, वेळ द्या पण आम्हाला आरक्षण द्या अशी मराठ्यांची मागणी आहे. माझं उभं खानदान कष्टात गेलंय त्यामुळे मी काही गोष्टी सहन करणार नाही. मी तुमच्या हिताचाच निर्णय घेणार, मी मुख्यमंत्र्यांना इथं आणूनच दाखवलं.