1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा राज्यात 26 जिल्हे अस्तित्वात होते. त्यानंतर प्रशासकीय सुविधेसाठी त्यात आतापर्यंत 10 नव्या जिल्ह्यांची भर पडून राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 36 झाली आहे. आता राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. Maharashtra State 22 new districts proposed , know which districts may be divided
प्रस्तावित नवीन 22 जिल्हे आणि 49 निर्मितीबाबत राज्य सरकारने मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. त्यामध्ये वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Maharashtra State 22 new districts proposed , know which districts may be divided
1998 नंतर प्रस्ताव
राज्यात १९८८ नंतर दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या ३६ जिल्हे २८८ तालुके आहेत. मात्र, सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयींची असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा तालुकानिर्मितीची मागणी केली आहे. Maharashtra State 22 new districts proposed , know which districts may be divided
एका जिल्हा निर्मितीसाठी तब्बल 350 कोटी खर्च
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दालनात या संदर्भात बुधवारी एक बैठकही पार पडली. एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान ३५० कोटी रुपये खर्च येतो. राज्य सरकारवर सध्या तीन लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. अशा परिस्थितीत जिल्हानिर्मितीवर खर्च करणे शक्य नसतानाही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मागणी असल्याने सरकारने २२ नवीन जिल्हे निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
अचलपूरसाठीही पाठपुरावा
सध्या अस्तित्वात असलेल्या १८ जिल्ह्यांचे विभाजन करून २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत नेत्यांनी काँग्रेस आघाडी सरकारला पत्रे पाठवली होती. आता राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्हानिर्मितीसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
प्रस्तावित नवीन जिल्हे (कंसातील)
बुलडाणा(खामगाव)
यवतमाळ (पुसद)
अमरावती (अचलपूर)
भंडारा (साकोली)
चंद्रपूर (चिमूर)
गडचिरोली (अहेरी)
जळगाव (भुसावळ)
लातूर (उदगीर)
बीड (अंबेजोगाई)
नांदेड (किनवट)
अहमदनगर (शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर)
नाशिक (मालेगाव, कळवण)
सातारा (मानदेश)
पुणे (शिवनेरी)
पालघर (जव्हार)
ठाणे (मीरा भाईंदर, कल्याण)
रत्नागिरी (मानगड)
रायगड (महाड)
मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा
खामगाव जिल्हानिर्मितीबाबत मी आणि आमदार आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नवीन २२ जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव असून, त्यात खामगावचा समावेश असल्याचे सांगितले. पांडुरंग फुंडकर, आमदार, विधान परिषद Maharashtra State 22 new districts proposed , know which districts may be divided