महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग फळबाग लागवड, बांधावर फळबाग लागवड,नाडेप खत उत्पादन युनिट, गांडूळ खत उत्पादन युनिट योजना चालू झाली आहे
तरी पात्र सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
१) ७/१२ उतारा
२) ८ अ उतारा (एकूण क्षेत्र २ हेक्टर पेक्षा कमी)
३) आधार कार्ड
४) राष्ट्रीय बँकेचे बँक पासबुक
५) जाँब कार्ड
६) ग्रामपंचायत ठराव
सलग फळबाग लागवडीस १ हेक्टर क्षेत्रासाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
आंबा कलमे – अनुदान 219634/-
चिक्कू कलमे – अनुदान 158890/-
पेरू कलमे – अनुदान 222665/-
डाळिंब कलमे – अनुदान 243135/-
लिंबू, संत्रा,मोसंबी – अनुदान 148873/-
सिताफळ कलमे – अनुदान 138542/-
बांधावरील फळबाग लागवडीस 1 हेक्टर क्षेत्रावरील एकुण 20 झाडांसाठी खालील प्रमाणे अनुदान मिळेल.
आंबा कलमे – अनुदान 32252/-
नारळ रोपे – अनुदान 21442/-
पेरू कलमे – अनुदान 10182/-
सिताफळ कलमे – अनुदान 6888/-
जांभूळ कलमे – अनुदान 19220/-
तसेच
नाडेप खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 10746/-
गांडूळ खत उत्पादन युनिट साठी एकूण अनुदान 11520/-
वरील प्रमाणे योजना चालू आहे सदर योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा हि विनंती. आपल्या ग्रामपंचायती मधील रोजगार सेवक किंवा गावच्या सहाय्यक कृषि अधिकारी ( कृषि सहाय्यक) यांचेशी संपर्क करा
हे ही लेख वाचा ————-
- संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे..सदरील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घटनेला आज 15 16 दिवस होऊनह मुख्य आरोपी अटक झालेली … Read more
- किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the announcement on 26th … Read more
- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाबीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी … Read more
- निरोगी आणि मजबूत जगण्यासाठी योग्य आहार आणि योग्य जीवनशैली जगण्यासाठी हे करून बघा..।दीर्घायुष्य या विषयावर प्रश्न विचारल्यावर चित्रपट रसिकांना ‘आनंद’ मधील “जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं” सारख्या … Read more
- महाराष्ट्र विधिमंडळ सन २०२४ चे हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले; प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले, 13 विधेयके संमत – वाचा मंजूर विधेयके व सविस्तर कामकाजविधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे … Read more