Maharashtra Unlock Update: राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार ?
मुंबई : राज्यात नव्या कोरोनाबाधित (Maharashtra Corona Virus) रुग्णांची संख्या घटल्याने लॉकडाऊनचे (Maharashtra Lockdown) निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल (Maharashtra Unlock) केला जाऊ शकतो. राज्य सरकार यासंदर्भात आज घोषणा करण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी या आठवड्याच्या सुरुवातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत संकेत दिले होते. त्यासोबतच दोन्ही लसी घेतलेल्या मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देखील देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे टोपे यांनी सांगितले होते. लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घोषणा करू शकतात
25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथील होणार 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच 1 ऑगस्टपासून 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील केले जाऊ शकतात. तर, राज्यातील 11 जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आहे.
या 11 जिल्ह्यांना मिळणार नाही दिलासा? कोरोना वाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त असलेल्या राज्यातील 11 जिल्ह्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहेत. यामध्ये पश्चम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी रायगडसह मराठवाड्यातील बीड , उस्मानाबाद आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्याचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यात कोरोना वाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा 0.11 टक्के अधिक नोंदवला गेला आहे. गरज भासल्यास या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर केले जाऊ शकतात असे संकेत देखील यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले होते.
हे ही वाचा ———————-
- समग्र शिक्षेचा संघर्ष संपणार? मुख्यमंत्र्याचे ठोस आश्वासन, कायम आदेश लवकरच लवकरच कायम करण्याचा आदेश!Will the struggle for comprehensive education finally end? The Chief Minister gives a
- ‘समग्र शिक्षा’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी ‘स्वेच्छा मरणाची’ परवानगी मागत उपोषणाचा इशारा!“Regularise or Allow Us to Die”: Samagra Shiksha Employees Threaten Hunger Strike Till
- नराधमाचा क्रूरपणा! मालेगावच्या मानदे डोंगराळेत चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या; संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट.Malegaon Horror: 24-Year-Old Man Held for Rape-Murder of 3.5-Year-Old Girl; Demand for Death
- माहुर पाचुंदा गावात दोन शेतकरी महिलांची निर्घृण हत्या! परिसरात खळबळwo Farmer Women Brutally Murdered in Pahuchunda Village; Local Area Stunned माहूर प्रतिनिधी
- अमेरिकेतील न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर: झोहरान ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयाची कहाणीZohran Mamdani Elected New York City Mayor in Historic Win; First Muslim &

