मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थिती बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Maharashtra Corona लॉकडाऊन Lockdown आणखी 15 दिवसांसाठी वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हा आता 15 जूनपर्यंत असणार आहे. मे महिन्यात काही जिल्ह्यांमधील परिस्थितीत नियंत्रणात आली तर काही ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाली. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत (CM Uddhav Thackeray Speech).
‘…तर तिसऱ्या लाटेचा सामना करणं कठीण होईल’
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात खाली आली आहे. पण आपण अद्यापही कोरोनाच्या नव्या विषाणूवर ताबा मिळवू शकलेलो नाही. अशा परिस्थितीत तिसरी लाट आली तर सर्व कठीण होऊन बसेल. आपण रुग्णालये, बेड्स, ऑक्सिजन सर्व व्यवस्था उभी करण्याता प्रयत्न करु. पण तरीही कोरोनाचा नवा म्युटेट आणि तिसरी लाटचा सामना करणं कठीण होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
‘कोरोना काळात धान्य वाटप, 55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत’
“कोरोना काळात धान्य वाटप केलं. 55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या. फेरीवाल्यांसाठी निधी दिला. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी काम करत आहोत. काही निर्बंध लादावे लागतात. त्यापेक्षा वाईट काम नाही. जी जनता आपल्याला आपलं मानते त्यांच्यावर बंधनं लादणं यापेक्षा कटू काम कोणतंही असू शकत नाही. कोरोना लाट खाली यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असं काही लोक विचारत आहोत. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. पण आजची जी मृतसंख्या ही गेल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्याच्या बरोबरीचं आहे. गेल्यावेळीची लाट ही सणासुदीनंतर आली होती. अजूनही आपण म्हणावं तेवढँ खाली आलोलो नाही. रुग्णसंख्या कमी होत आली असली तरी गेल्यावेळीची सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीची संख्या आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हल्कीशी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण आपल्याला थांबवायला हवं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. आताचा जो विषाणू आहे तो झपाट्याने वाढतो आहे. तो झपाट्याने पसरतोय. रुग्णाला बरं व्हायला उशिर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता वाढली. काही जणांना ऑक्सिजनची गरज जास्त लागली. ही वस्तूस्थितीत आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले (CM Uddhav Thackeray Speech).
“सध्या कोरोना रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे निर्बंध उठवण्यात येतील का? असा प्रश्न उभा राहतोय. सध्या रुग्णसंख्या ही मागील लाटेच्या सर्वोच्च शिखराएवढी आहे. म्हणजे रुग्णांचा उच्चांक आहे त्याची तुलनात्मक माहिती देणारच आहे. साधारण 17 ते 19 सप्टेंबर 2020 च्या सुमारास आपल्या राज्यात 24 हजार 886 रुग्ण एका दिवसात सापडत होती. आता 26 मे रोजी बघायचं झालं तर साधा 24 हजार 752 रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच म्हणावे तेवढे रुग्ण कमी झालेले नाहीतेय. पहिल्या लाटेच्या उच्चांकात सक्रिय रुग्ण साधारण 3 लाख 1752 होते. आज 26 मे ला तीन लाख 1542 आहेत. म्हणजे मागील लाटेच्या उच्चांकाच्या आपण आज बरोबरीला आहोत. एक मात्र दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यावेळी 78 टक्के होते. आता यावेळा या दिवसांमध्ये प्रमाण 92 टक्के आहे. मृत्यूदरसुद्धा गेल्या वेळेला 2.65 टक्के होता यावेळा तो 1.62 टक्के आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.