देश प्रदेश

महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी बाळगलं मौन

Female MLA’s pornographic video goes viral, police remain silent

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या महिला आमदाराचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंजाबमधील तक्षशिला विधानसभा मतदारसंघातील पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) च्या आमदार सानिया आशिक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली, मात्र त्याच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. आमदार सानिया यांना गेल्या महिन्यात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल माहिती मिळाली.

 त्यानंतर त्यांनी 26 ऑक्टोबर रोजी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेला याबाबत माहिती दिली. ‘Ary न्यूज’च्या रिपोर्टनुसार, 26 ऑक्टोबर रोजी सानिया आशिक यांनी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) कडे तक्रार दाखल केली होती. नंतर तक्रारीची एक कॉपी त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केली. 

सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून एक अश्लील व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी स्त्री त्याच्यासारखीच दिसते. अशात व्हिडीओमध्ये दिसणारी महिला सानिया आशिक असल्याचा दावा केला जात आहे.

तक्रारीनंतर पंजाब प्रांतातील पोलीस आणि एफआयएने तपास सुरू केला. सुमारे तीन आठवडे चाललेल्या तपासानंतर पोलिसांनी लाहोरमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. मात्र, त्या व्यक्तीची ओळख उघड झालेली नाही. 

व्हिडीओमध्ये दिसणारी महिला सानिया आशिक आहेत की आणखी कोणी आहे हेही पोलिसांनी सांगितले नाही. पोलिसांनी एवढंच सांगितलं की नवीन एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या व्यक्तीची अधिक चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Female MLA’s pornographic video goes viral, police remain silent

ताज्या व महत्त्वाच्या बातम्या ——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 10
  • Today's page views: : 10
  • Total visitors : 504,607
  • Total page views: 531,366
Site Statistics
  • Today's visitors: 10
  • Today's page views: : 10
  • Total visitors : 504,607
  • Total page views: 531,366
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice