एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Eknath Shinde as Chief Minister while Devendra Fadnavis as Deputy Chief Minister Oath in Governer house

मुंबई : गेल्या 10 दिवसांपासून राज्यात सत्तांतर होणार होणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर आज अखेर राज्याला नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा चेहारा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तर, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde First Reaction After Taking Oath Of Maharashtra CM) Eknath Shinde as Chief Minister while Devendra Fadnavis as Deputy Chief Minister Oath in Governer House

शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा हा विजय आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिलं आव्हान काय स्वीकाराल असे विचारले असता शिंदे म्हणाले की, राज्याचा विकास आणि राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याच काम राज्य सरकारकडून केलं जाईल. सर्वांनासोबत घेऊन आणि विश्वासात घेऊन काम केले जाईल. या कामामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसदेखील सोबत आहेत. त्यामुळे सर्वांच्या सोबतीने हा जो काही विकासाचा गाडा आहे तो पुढे नेण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला जाणार आहे.

गेले दहा दिवस राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यानंतर अखेर आज महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. यानंतर आज दुपारी पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केले होते. सुरवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होत. मात्र शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्यात आले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या दोघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

https://www.youtube.com/watch?v=o-YdnScq0sY

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गदारोळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी गोव्याहून मुंबई गाठून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर फडणवीस आणि शिंदे राजभवनात पोहोचले. येथे त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हणजेच २९ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी चर्चा होती. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन सर्वांनाच चकित केले. Eknath Shinde as Chief Minister while Devendra Fadnavis as Deputy Chief Minister Oath in Governer house

महत्वाच्या बातम्या :

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice