Cyclone Tauktae Updates| दिवस भराची माहीती|हवामानाचा अंदाज,कुठे पडणार पाऊस, कुठे येणार सुसाट वारा- वाचा सविस्तर

 अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून (Mumbai rains) जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय. त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.

  • Cyclone Tauktae LIVE Sangli : सांगलीत 6 एकरवरील केळी बाग भुईसपाटतौक्ते चक्रीवादळाचा फटका सांगली जिल्ह्यालाही बसला आहे.मिरज तालुक्यातील कवलापूर या ठिकाणी सहा एकरावरील केळी बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे,त्यामुळे लाखो रुपयांचा नुस्कान झालेली आहे. चक्रीवादळाचा परिणाम सांगली जिल्ह्यातही काल दुपारपासून आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता, दरम्यान रात्री उशिरा चक्रीवादळाचा मोठा फटका मिरज तालुक्यातल्या कवलापूर या ठिकाणी बसल्याचे पाहायला मिळालं.
  • 17 MAY 2021 16:42 PM (IST)Cyclone Tauktae Tracker LIVE Pune पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाजपुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, पुणे जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शिनोलीमधील भगवान बोऱ्हाडे या शेतकऱ्याचं आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, 70 झाडांची आंब्याची बाग पूर्ण गळाली, तर खेड तालुक्यातील भिवगाव इथं अंगणवाडीवरचे पत्रे उडाले, तौक्ते चक्रीवादळाचा घाटमाथ्याला फटका बसण्याची शक्यता
  • 17 MAY 2021 16:01 PM (IST)Aditya Thackeray on Mumbai Rains : मुंबईत अभूतपूर्व वादळ, सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष : आदित्य ठाकरेवादळचाी दिशा गुजरातकडे आहे, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, सखल भागात पाणी साचलंय, जम्बो सेंटर्सच्या मेंटेन्सनची कामं सुरु आहेत, रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका, हे वादळ आहे, मुंबईत कधीही न झालेलं वारं आपण पाहात आहोत..१६० मिमी पाऊस, १२० मिमी पाऊल तो ही वादळ-वाऱ्यासह होतोय, मनुष्यहानी काही होणार नाही, याची काळजी घेत आहोत, हाय टाईड आहे, ती निघून जाईल, पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल.. चक्रीवादळ कधीही न पाहिलेलं मुंबई आता पाहात आहे.. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा झालीकेंद्र आणि राज्यात चर्चा होते, आवश्यक सूचना दिल्या जातात, एकमेकांशी समन्वय साधून काम करत आहोत…सर्वजण मिळून काम करत आहोत…
  • 17 MAY 2021 15:45 PM (IST)किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणारहवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई आणि किनारपट्टी भागावर राहणार, मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी कोसळणार, पुढच्या 24 तासात उत्तर कोकणात पाऊस, दक्षिण कोककणात ढगाळ वातावरण असेल, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी पाऊस कोसळेल
  • 17 MAY 2021 15:39 PM (IST)पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चातौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, पंतप्रधानांकडून वादळाचा आढावा
  • 17 MAY 2021 15:27 PM (IST)Cyclone Tauktae Live Baramati : तौत्के चक्रीवादळाचा वीज यंत्रणेला मोठा फटकातौत्के चक्रीवादळाचा वीज यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. बारामती परिमंडलात 547 वीजेचे खांब कोसळले.तर 18773 रोहित्र बंद पडल्याने 869 गावांतील काही काळ वीजपुरवठा विस्कळीत, वीज कर्मचाऱ्यांनी काही तासांतच 44 उपकेंद्र व 3 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला.
  • 17 MAY 2021 14:43 PM (IST)Cyclone Tauktae Live Kalyan : जाहिरात फलक टेम्पोवर कोसळला, दोघे गंभीर, पत्रा कापून दोघांना बाहेर काढलंकल्याण शीळ रोडवर धक्कादायक प्रकार, रस्त्याच्या कडेला असणारा भलामोठा जाहिरात फलक एका टेम्पोवर पडला, गाडीतील 2 जण गंभीर जखमी, कटर मशिनने टेम्पोचा पत्रा कापून दोघांना काढले बाहेर, गंभीर असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू, डोंबिवली एमआयडीसी फायर ब्रिगेड अधिकारी नंदकुमार शेंडगे यांची माहिती.
  • 17 MAY 2021 14:01 PM (IST)Cyclone Tauktae Live Raigad : रायगडमध्ये 1 हजार घरांचे अंशत: नुकसान, 8 हजार नागरिकांचं स्थलांतरअलिबाग,जि.रायगड,दि.17 :- “तौक्ते” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा आणिमुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी 11 .00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 1 हजार 104 घरांचे अंशत: नुकसान तर 1 घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचाही मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
  • 17 MAY 2021 13:52 PM (IST)Cyclone Tauktae Live Satara : तौक्ते वादळाचा साताऱ्याला फटका, अनेक घरांची पडझडसातारा जिल्हयातील पश्चिम भागाला तौक्ते वादळी वाऱ्याचा मोठा फटका, जिल्ह्यातील प्रतापगडसह, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा फटका, महाबळेश्वर तालुक्यात 22 घरांचे, 3 शासकीय इमारतींचे अंशतः नुकसान, तसेच 18 विद्युत पोल आणि विद्युत वाहिनीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती, वाई तालुक्यात 7 घरांचे तर एका शाळेचे, 10 विद्युत खांबांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती
  • 17 MAY 2021 13:47 PM (IST)Cyclone Tauktae Live Mumbai Gateway of India : मुंबईच्या समुद्रात भरती, 3.94 मीटरपर्यंत लाटा उसळणारमुंबईच्या समुद्रात दुपारी भरती, दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी समुद्राला भरती, समुद्र किनारी नागरिकांनी न जाण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन, अरबी समुद्रात उसळणार 3.94 मीटरपर्यंत लाटा
  • 17 MAY 2021 12:57 PM (IST)Cyclone Tauktae Mumbai Gateway of India : अरबी समुद्राला उधाण, गेट वे परिसरात तुफान पाऊसमुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरातील दृश्य, तुफान पाऊस आणि तौत्के चक्रीवादळाचा परिणाम, समुद्राला उधाण, उंचच उंच लाटा आणि वाऱ्याचे प्रंचड वेग
  • 17 MAY 2021 12:30 PM (IST)Cyclone Tauktae Nashik Live : चक्रीवादळाचा नाशिकला फटका, झेडपी शाळेचं छप्पर उडालंतौक्ते चक्रीवादळाचा नाशिक जिल्ह्यातील हरसूल तालुक्याला फटका, सकाळी आलेल्या वादळाने जिल्हापरिषदेच्या शाळेचे छप्पर उडाले, जिल्हा परिषदेच्या सांबरखल शाळेचं मोठं नुकसान, राज्यपालांनी दौरा केलेल्या गुलाबी गावातही मोठं नुकसान
  • 17 MAY 2021 11:53 AM (IST)Cyclone Tauktae and Mumbai rain update : मुंबईत ऑरेंज अलर्ट, रायगडमध्ये रेड अलर्टमुंबई वेध शाळेच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 24 तास ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रायगडमध्ये रेड अलर्ट आहे, मुंबईत 102 किमी वेगाने वारे वाहत होतं, आज संध्याकाळपर्यंत अशीच परिस्थिती राहील, मुंबई, ठाणे, पालघर ,रायगडमध्ये 90 किमी प्रतितासाच्या वेगाने वारे वाहतील, उद्या वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी असा राहील, उद्या पाऊस हलक्या स्वरुपाचे असेल
  • 17 MAY 2021 11:28 AM (IST)Cyclone Tauktae Mumbai Mayor Kishori Pednekar : मुंबईत सर्व यंत्रणा सज्ज, सीलिंक सुरक्षतेसाठी बंद : महापौरमुंबईत सर्व यंत्रणा सज्ज आहे, मुंबईत चक्रीवादळाचे परिणाम दिसत आहेत, अनेक भागात झाडं पडली आहेत, जीवितहानी नाही, मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, वरळी सीलिंक सुरक्षतेसाठी बंद ठेवला आहे – महापौर किशोरी पेडणेकर
  • 17 MAY 2021 11:17 AM (IST)Tauktae LIVE worli rain update : मुंबईचा वरळी केळीवाडा जलमयमुंबईचा वरळी केळीवाडा जलमय, समुद्राला उधाण आल्याने समुद्राचं पाणी , पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरलं, गुडगाभर पाणी भरल्याने नागरिक हैराण, दक्षिण मुंबई परिसरात तुफान पाऊस

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice