गोड साखरेची कडू कहानी पत्नीच्या फेसबुक लाईव्ह चालू असताना नवऱ्याचा दुर्दैवी अंत निष्ठुर नियतीने 3 चिमुकल्यांचा बाप तर वृद्ध मायबापाचा आधार हिरावला…
“टिचभर पोटाच्या खळगीची भिषण करुण कहानीचा दुर्दैवी अंत”
The bitter story of sweet sugar: The husband’s unfortunate end while his wife was on Facebook Live. A cruel fate deprived him of the support of his father of 3 young children and his elderly parents…
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील गणेश डोंगरे व आश्विनी डोंगरे हे अत्यंत हलाखीची परिस्थिति असणारं रिलस्टार जोडपं सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सर्वपरिचीत आहे..!
वृद्ध आईवडिल व 3 चिमुकल्या लेकरांची जबाबदारी असणारं हे जोडपं गावी भागत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी लेकरांच्या भविष्याचा विचार करुन लातुर येथे कारखान्याला उसतोडीसाठी गेलं होतं कारखान्यावर माप घ्यायला सर्वत्र भरलेल्या गाड्या उभ्या होत्या आणि कारखान्याच्या दिरंगाईमुळे मापं घेणं हे उशीराची प्रक्रिया असल्यामुळे गणेश डोंगरे आणि अन्य एकजण ऊन असल्यामुळे हे तिथं भरलेली गाडी लावुन गाडीच्या सावलीला बसले होते आणि तितक्यात दुसऱ्या गाडीचा धक्का बसल्यामुळे भरलेली ट्रॉली गणेश डोंगरे व अन्य एकाच्या अंगावर पडली त्यात गणेश यांचा दवाखान्यात नेतावेळेस मृत्यु झाला तर अन्य एकजण गंभीर आहे.
त्याचवेळेस अगदी काही मिनिटे गणेश यांची पत्नी अश्विनी डोंगरे ह्या फेसबुक लाईव्ह करुन तिथली कारखान्याची विदारक परिस्थिति दाखवत असतानाच अचानक ट्रॉली पडल्याचा मोठा आवाज आला आणि त्या क्षणी त्या किंचाळल्या…आणि ऊसतोडी करुन जगणारं हे हसतं खेळतं कुटुंब क्षणात उध्वस्त झालं व 3 चिमुकल्या बापाला कायमचं मुकल्या..!
रात्रंदिवस उसतोड करुन उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाचा पोशिंदा नियतीने हिरावल्यामुळे 3 चिमुकल्या व वृद्ध मायबाप उघड्यावर पडले आहेत त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे तरी सर्व दानशुर व्यक्तिंना विनंती आहे पुढे येऊन जबाबदारी घेत त्यांनी या कुटुंबाला मदत करावी.

