माहूर (प्रतिनिधी आज़ीम सय्यद ) शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे व उपनगराध्यक्षा सौ.अश्विनीताई आनंद पाटील तुपदाळे यांनी जलक्रांतीचे प्रणेते भारताचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचे निमित्याने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, पंचायत समिती, पत्रकार संघ, रेणुकादेवी संस्थान, शिक्षण विभाग व कोरोना महामारीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या समाजातील मान्यवर मंडळीचा सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
माहूर येथील हॉटेल पुष्कराज येथे आयोजित या सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ कॉंग्रेस नेते नवीन राठोड, व उद्घाटक माजी खा.सुभाष वानखेडे हे होते तर ना.जी.म.स. बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे, किशन राठोड, युवक काँग्रेस वैद्यकिय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे, नगराध्यक्षा शीतल जाधव माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर,माजी उपनगराध्यक्ष मुनाफभाई, उमरखेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन कदम पाटील, उमरखेड तालुका युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन.भोसले एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहान, मुख्याधिकारी विद्या कदम, स.पो.नि आण्णासाहेब पवार,यांची उपस्थिती होती.
गेल्या दोन वर्षापासून थैमान घालत असलेल्या कोरोना महामारिशी मुकाबला करतांना सर्व कोरोना योद्ध्यांनी आपला परिवाराच्या व आपल्या जीवित्वाची जोखीम घेत तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण केले असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून कोरोना योद्ध्यांचे जाहीर अभिनंदन व्यक्त केले. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्ते सचिन बेहेरे, राजकिरण देशमुख, राजू सौंदलकर, शे.आयुब,विद्यार्थी कांग्रेस ता.अध्यक्ष आजीम सय्यद, मोईन खान, निसार कुरेशी, सलमान काझी, अब्दुल हक्क सौदागर, निलेश गावंडे, आकाश कांबळे, दीपक मुरादे, खाजाभाई, गोविंद आराध्ये, संजय गायकवाड,रवी वायकुळे, नबीसाब, अमोल कदम, सोनू राठोड, आनंदराव कलाने, हनीफभाई, करिम शहा आदीसह कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ तामगाडगे, जयकुमार अडकीने यांनी केले.
===========================================================================================