स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर यंत्रराज सापडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा पुरावा आ्रहे असे यासंदर्भात एक पोस्ट करत छत्रपती संभाजीराजे यांनी माहिती दिली आहे. रायगड किल्ल्यावर अलीकडेच भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त उत्खनन कार्यात एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण, ‘यंत्रराज’ किंवा ‘सौम्ययंत्र’ (Astrolabe), सापडले आहे. हे उपकरण प्राचीन काळात ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशा निश्चिती आणि वेळ मोजण्यासाठी वापरले जात होते.
या यंत्रराजावर कोरलेली अक्षरे आणि कासव/सापासदृश प्राण्यांचे अंकन आढळले आहे, ज्यामध्ये उत्तर आणि दक्षिण दिशा दर्शविण्यासाठी ‘मुख’ आणि ‘पूंछ’ अशी अक्षरे कोरलेली आहेत. हे उत्खनन कुशावर्त तलाव, पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिर परिसरात झाले, जिथे शिवकालीन वाड्यांचे अवशेष सापडले. या शोधामुळे शिवकालीन वास्तुकला आणि तंत्रज्ञानावर नवीन प्रकाश पडण्याची शक्यता आहे, आणि इतिहास संशोधकांना पुढील अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडून रायगड परिसरात उत्खनन सुरु आहे. कुशावर्त तलावाच्यावरच्या भागात पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिरातील भागात असलेल्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर उत्खनन करताना हे प्राचीन यंत्रराज खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.
रायगडाचे बांधकाम कसे झाले याचा पुरावा..?
रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजाची राजधानी. हा किल्ला कसा बांधला गेला याचा पुरावा हे यंत्रराज देत असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. खगोलशास्त्रीय अभ्यास करुन तत्कालिन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते अशी शक्यता आहे. यंत्रराजच्या माध्यमातून यासंदर्भात महत्वाचा पुरावा मिळून आला आहे असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे यंत्रराज?
संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, प्राचिम कालखंडापासून ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी, दिशांचा वेध घेणे तसेच वेळ मोजण्यासाठी ज्या यंत्राचा वापर केला जातो त्याला Astrolabe म्हणजेच यंत्रराज असे म्हटले जाते. अक्षांश, रेखांश, विषुववृत्त आणि कर्कवृत्त आदींचा अभ्यास करण्यात या यंत्रराजचा महत्वपुर्ण वापर केला जातो.
कधीपासून सुरु आहे रायगडावर उत्खनन?
रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्यातर्फे संयुक्तरित्या दुर्गराज रायगडाचे गेल्या काही वर्षांपासून उत्खनन सुरु आहे.रोपवे अप्पर स्टेशन च्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत व बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमधे जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास 10 ते 12 ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे. ऐतिहासिक संदर्भ आणि पुराव्यांसाठी उत्खनन महत्वाचे आहे, त्यादृष्टीने या परिसरातील शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत अशा बारा ठिकाणी उत्खनन कार्य पुर्ण झाले आहे.
यंत्रराज अमुल्य ठेवा
या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव/साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन केलेले