मुद्रांक विक्रेत्यावर लाचलुचपत विभागाचा छापा; जास्त किमतीला मुद्रांक विकत असल्याची तक्रार
माहुर:- (तालुका प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर कऱ्हाळे) तक्रारदार यांनी लोकसेवक अमृत जगताप यांचेकडून दि ८ आगस्ट रोजी शंभर रूपयाचे मुद्रांक(बॉण्ड पेपर) खरेदीसाठी गेले होते. तेव्हा यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना शंभर रूपयाचे मुद्रांक (बॉण्ड पेपर)हे १२० रूपयास विक्री केले होते. तेंव्हा तक्रारदार यांनी लोकसेवक यांना अधिकचे २० रूपये कशाचे अशी विचारणा केली असता लोकसेवक तक्रारदार यांना म्हणाले की ते ईतर व्यक्तींकडून १३० रूपये घेतात परंतु तक्रारदाराजवळून फक्त १२० रूपये घेतले आहे. Anti-corruption department raids stamp seller; Complaint of selling stamps at high prices
त्यावेळी तक्रारदार यांना कामाची गरबड असल्यामुळे तक्रारदार यांनी नाईलाजास्तव १०० रूपये किंमतीचे मुद्रांक १२० रुपयास खरेदी केले. त्यानंतर तक्रारदार यांना शेतकरी आत्मा बचतगट करीता १०० रूपये दराच्या १० मुद्रांकाची(बॉण्ड पेपरची) गरज होती. मुद्रांक विक्रेता अमृत जगताप हा प्रत्येक मुद्रांकाच्या पाठीमागे २० रूपये अतिरिक्त असे एकूण २०० रूपये घेतल्याशिवाय मुद्रांक देणार नाही व मुद्रांक विक्रेता घेत असलेली अतिरिक्त रक्कम देण्याची तक्रारदार यांना मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दि ११ आगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे लेखी तक्रार दिली होती.
तक्रारीची पडताळणी दि.१२ आगस्ट रोजी सदर तक्रारीच्या अनुषंगाने शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली असता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना १०० रू दराचे १० मुद्रांक देण्याकरीता नियमा प्रमाणे १००० रूपयां ऐवजी १२००रूपयांची मागणी केली. नमुद रकमे मध्ये लोकसेवक अमृत जगताप यांनी तक्रारदार यांचेकडे २०० रूपयाच्या गैरफायद्याची मागणी करून तडजोडअंती १५० रूपये अधिक
रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
दि १२ रोजी माहूर तहसिल कार्यालयाच्या गेट समोर सापळा कारवाईत यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना १०० रू दराचे १० मुद्रांक (बॉण्ड पेपर) देण्याकरीता तक्रारदार यांचेकडून ११५० रूपये स्वीकारले. त्यामध्ये १०० रुपये दराच्या १० मुद्रांकाची एकूण किंमत १००० रूपये व गैरफायद्याची रक्कम १५० रूपये अशी रक्कम पंचासमक्ष स्वीकारलेली आहे.आरोपीचे अंग झडतीत आरोपी लोकसेवक यांचेकडे रोख ४ हजार २०० रूपये व एक मोबाईल असा गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे. सदर छापा अर्चना करपुडे, पोलीस निरीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड. पोहेकाॅ संतोश वच्चेवार, पोकाॅ/ईश्वर जाधव, शिवानंद रापतवार, चापोहेकाॅ/रमेश नामपल्ले सर्व ने. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड यांनी कार्यवाही केली
सूचना :- Chatgpt AI generated photo तयार केलेला Thumbnail