पानेवाडी शाळेत विद्यार्थ्यांचा आनंदबाजर; शालेय परिसर गाजलेला, २० हजार रुपयांची उलाढाल

पानेवाडी शाळेत विद्यार्थ्यांचा आनंदबाजर; शालेय परिसर गाजलेला, २० हजार रुपयांची उलाढाल


जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंदमेळा बालबाजार (आनंदनगरी) चे आयोजन करण्यात आले होते .मुलांचे व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी तसेच शिक्षणाबरोबरच आर्थिक व्यवहाराचे ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून मिळावे त्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्साहात शेतीमधील भाजीपाला व अन्य वस्तू त्यामध्ये स्वतः तयार केलेले पदार्थ व वस्तू यांचे स्टॉल लावून त्यांची विक्री केली.

सदर बालबाजारात इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध प्रकारच्या २० ते २५ प्रकारच्या साहित्यांचे,पदार्थांचे स्टॉल मांडून जवळपास २० हजार रुपयांची उलाढाल करून प्रत्यक्ष खरेदी विक्रीचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला.. बालबाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला ,विविधफळे,समोसे, कचोरी, चहा, पाणीपुरी, शैक्षणिक साहित्य,खमंग पापड,चना उसळ,पोहे अशा अनेक प्रकारचे स्टॉल मांडून उत्तम प्रकारे वस्तूंची विक्री केल.

त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांना हिशोब करतांना गणितीय आकडेमोड करून पैशांचे व्यवस्थापन करता येत होते.बाजारात आपला माल विकतांना ग्राहकांना कशा प्रकारे सामोरे जावे लागते,वस्तूची विक्री करतांना ताजी भाजी,कोवळी भाजी, गरम भजे, खमंग पापड,गोड पेरु घ्या अशा प्रकारच्या आवाजाने शालेय परिसर अक्षरशःनिनादून गेला होता.


शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी ,पालक तसेच गावातील नागरिकांनी वस्तू खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला .या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येत होता..हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव देऊन गेला..सदर आनंद नगरीच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अंभोरे सर,शिक्षक श्री मेहेत्रे सर,श्री लोदवाल सर,श्री वाघ सर,श्री ताठे सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बालाजी भाकड ,उपाध्यक्ष श्री अनुरुद्ध म्हस्के व समितीच्या सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन व परिश्रम केले….

<

Related posts

Leave a Comment