गेल्या वर्षभरापासून देशात ठाण मांडून बसलेल्या कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. त्यातच या विषाणूची दुसरी लाट आल्यामुळे सर्वत्र उलथापालथ झाली आहे. अद्याप तरी या विषाणूवर कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे या काळात आपणच आपली काळजी घेण्याची व रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवण्याची गरज आहे. दररोज सकस व पौष्टिक आहार आणि फळे, भाज्या यांचा आहारात समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर (immunity) चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही असाध्य रोगावर सहज मात करु शकता. परंतु, आपली रोगप्रतिकारक शक्ती किती आहे किंवा ती कमी झाली तर कसं ओळखावं असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची लक्षणं कोणती ते पाहुयात. (coronavirus know is your immunity is weak know ways boost immunity)
१.थकवा येणे -रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी पॉवर कमी होण्याचं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे सतत थकवा येणं. कोणतंही काम केल्यावर लगेच दमल्यासारखं किंवा थकल्यासारखं होणं. तसंच पटकन झोप न लागणं हे रोगप्रतिकारक शक्ती कमी असण्याचं लक्षण आहे.
२. पोटाचे विकार – आहारात सकस व पौष्टिक पदार्थाांचा समावेश नसेल तर सहाजिकच आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होणार आहे. त्यातूनच मग पोटाचे विकार डोकं वर काढतात. मग, सतत पोटात दुखणे, अॅसिडिटी होणे या सारख्या समस्या जाणवतात
३. आळस येणे – आळस येणं हेदेखील इम्युनिटी कमी असण्याचं लक्षण आहे. जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर सतत मरगळ येणे, कंटाळा येणे वा आळस येणे या समस्या जाणवतात.
४. शारीरिक तक्रारी – शरीरातील अन्य विषाणूंसोबत लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती असणं अत्यंत गरजेचं आहे. पण, जरी तुमची इम्युनिटी खराब असेल तर सहाजिकच तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. परिणामी, सर्दी, खोकला, पोटदुखी वा अन्य दुखणी वारंवार जाणवतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की का
१. जास्तीत जास्त सकस व पौष्टिक आहाराकडे लक्ष द्या.
२. फास्ट फूड खाणं टाळा.
३.व्हॅटामिन ईचा समावेश असलेल्या फळांचा आहारात समावेश करा.
४. पालेभाज्या व फळे जास्तीत जास्त खा.
५. शिळं अन्न खाऊ नका.
६. शरीराला आवश्यक असेल तितकाच आहार घ्या.
७.पुरेशी झोप घ्या.