पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री रेणुका देवी संस्थानाचा मदतीचा हात, एक कोटी साह्याता निधी जाहीर – जिल्हाधिकारी कर्डीलेंची माहिती
Shri Renuka Devi Sansthan Extends Helping Hand to Flood Victims, Announces ₹1 Crore Relief Fund – District Collector Kardile
श्रीक्षेत्र माहूर :- ज्ञानेश्वर कऱ्हाळे मराठवाडा सततच्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः हादरला आहे. नदी-नाले फाटून वाहत आहेत, शेतजमिनी वाहून गेल्या आहेत, शेतकऱ्यांचे पिकं आणि स्वप्न चिखलात गाडले गेले आहेत. शासनाकडून मदतीचे आवाहन होत असताना माहूरगडावरील श्री रेणुका देवी संस्थानाने पुढाकार घेतला असून दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केल्याची माहिती माहूर येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली
दि 30 रोजी दिलीजिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांनी ही माहिती मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी दिली. हा निधी फक्त आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्यांच्या वेदनेत देवही सामील आहे, याचा स्पष्ट संदेश देणारा ठरला आहे.याआधी शिर्डी-साई, शेगाव गजानन, तुळजापूर भवानी या देवस्थानांनी शासनाच्या मदतीला प्रतिसाद दिला होता. माहूरगड संस्थानाच्या पुढाकाराने ग्रामीण शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळणार आहे.दरम्यान, जिल्ह्यातील महसूल विभागाने एक दिवसाचा कर्मचाऱ्यांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला असून, तब्बल २ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. कर्डिले यांनी एनजीओ आणि इतर संस्थांना देखील आपत्तीच्या काळात सहाय्यता निधी शासनाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले आहे.हा निर्णय केवळ आर्थिक मदत नाही, तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी देवस्थानांचा विश्वास आणि सामाजिक जबाबदारी याचे प्रतीक ठरला आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता विशाल चोपडे तहसीलदार अभिजीत जगताप उपविभागीय अभियंता डि के भिसे मुख्याधिकारी विवेक कांदे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासह पत्रकार मान्यवरांची उपस्थिती होतीजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या दौऱ्यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक नांदेड च्या मुख्य अभियंता श्रीमती रूपा राउळ गिरासे यांनी भेट देऊन लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामासह इतर बांधकामांची पाहणी केली. Shri Renuka Devi Sansthan Extends Helping Hand to Flood Victims, Announces ₹1 Crore Relief Fund – District Collector Kardile