बीडमहाराष्ट्रराजकारण

Santosh Deshmukh Murder Case | पोलिसात प्रशासनाची हतबलता की तपास यंत्रणा फेल; वाल्मीक कराड स्वतःच शरण

बीड केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपा सुरू आहे. त्यातच, आज बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) आज सीआयडी पोलिसांसमोर शरण आत्मसमर्पण केले असन सीआयडीने त्याला अटकही केली आहे. The weakness of the police administration or the failure of the investigative system; Valmik Karad surrendered himself

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला हत्या झाल्यानंतर सात आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल झालेला होता. त्यापैकी चार आरोपी पोलिसांनी अटकेत असून तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. ज्या खंडणीच्या प्रकरणावरून संतोष देशमुख यांच्या हत्या झाली त्यामध्ये खंडणीचे मास्टरमाईंड म्हणून. वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यावर दोन कोटी खंडणीचा गन्हा दाखल झालेला आहे. तेव्हापासून वाल्मीक कराड फरार होते. पोलिसांच्या शोधा शोध करुन ही सापडले नाहीत. तर ते पुण्यातच CID ऑफिसमध्ये स्वतःहून सरेंडर झाले. यामुळे पोलीस प्रशासन तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. केज कोर्टात आज सुनावणी करण्यासाठी सीआयडी तर्फे विनंती केली असता न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याची माहिती पुढे आली आहे. वाल्मिक कराडच्या रिमांडसाठी आजचं केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज (31 डिसेंबरला) संध्याकाळी  7.30 नंतर सुनावणीसाठी सीआयडीने विनंती केली होती. या विनंतीला न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय सुनावणी होते याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.    

सरेंडर होण्यापूर्वी वाल्मीक करणे यांनी तीस सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 13
  • Today's page views: : 13
  • Total visitors : 505,482
  • Total page views: 532,263
Site Statistics
  • Today's visitors: 13
  • Today's page views: : 13
  • Total visitors : 505,482
  • Total page views: 532,263
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice