सदरील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घटनेला आज 15 16 दिवस होऊनह मुख्य आरोपी अटक झालेली नाही. घटनेतील मास्टरमाइंड ही अटक नाहीत. प्रशासनाचा तपास अत्यंत संथगतीने चालू असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. नेमकं प्रशासनावर कुठल्या लोकप्रतिनिधीचख दबाव आहे का? असे लोकांमध्ये चर्चा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे.. Beed’s Mahanishedh Morcha in the Santosh Deshmukh murder case is not against casteism but against gangsterism.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून मराठा क्रांती मोर्चाने देखील आता या घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. बीडमधे झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील लालबागमध्ये मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तसेच या हत्येच्या प्रकरणात येत्या 28 तारखेला बीडमधे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.
बीडमध्ये काय घडले? बीड जिल्ह्यातील केज तहसीलमधील मस्साजोग गावात, आवडा ग्रीन एनर्जी (एव्हीजी) या पवन ऊर्जा प्रकल्प कंपनीत गुंडगिरी आणि खंडणीच्या बोलीमध्ये हस्तक्षेप केल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानुसार, ६ डिसेंबर रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटू न दिल्याने आरोपी अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रदीप घुले यांनी एव्हीजीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. देशमुख यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण केली. प्रत्युत्तर म्हणून देशमुख आणि ग्रामस्थांनीही त्यांच्यावर हल्ला केला. या झटापटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला. डिसेंबर ९ रोजी आरोपींनी देशमुख यांचे अपहरण केले आणि नंतर ते मृतावस्थेत आढळले. जिल्ह्यातील आमदारांच्या मते, देशमुख यांना छळण्यात आले, त्यांचे डोळे जाळण्यात आले आणि त्यांना लोखंडी सळईने क्रूरपणे मारहाण करण्यात आली ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेतील सर्व आरोपी वंजारी समाजाचे असून. या घटनेमध्ये जातीवादाचा मुद्दा ऐरणीवर येत असल्याने वंजारी मराठा वाद आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर होते. परंतु बीडमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे व सर्व पक्षाचे लोक सामील असल्याने हा मुद्दा जातीवादाचा नसून गुंडगिरीचा आहे असे मेसेज देण्यात आलेला आहे.