मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यासह जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर), सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (तिघेही, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी, ता. धारूर) यांचा आरोपी म्हणून सहभाग आढळला आहे. There is no casteism in the murder case of Sarpanch Santosh Deshmukh. The severe torture, cruelty and brutal killing have caused anger and resentment among the people, do not support the accused in the name of casteism, citizen’s opinion
यातील जयराम, महेश आणि प्रतीक हे तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. परंतु, यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर चार आरोपी अजूनही मोकाटच आहेत. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह वेगवेगळी पाच ते सहा पथके रवाना झालेली आहेत. तसेच याच प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. There is no casteism in the case of the deceased Sarpanch Santosh Deshmukh. The severe torture, cruelty and brutal killing have caused anger and resentment among the people.
अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानेच मृत्यू
केज तालुक्यातील मस्साजोग हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे प्राथमिक कारण समोर आले आहे. यामध्ये आरोपींनी सरपंचाला वाहनातच कपाळापासून ते घोट्यापर्यंत वायररोपने आणि बुक्क्यांनी मुकामार दिला. त्यामुळे वरून जखम दिसत नसली तरी डोक्यात, फुफ्फुसासह यकृत आणि इतर अवयवयांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाला. यामुळेच सरपंचाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत शवविच्छेदन करण्यात आले होते. यामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानेच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. याचा सखोल अभ्यास केला जात आहे. The severe torture, cruelty and brutal killing of Sarpanch Santosh Deshmukh has caused public anger and resentment.
या प्रकरणी कोणताही जातिवाद नसून सदरील अपहरण व हत्या ही एवढ्या क्रुरतेने केली आहे की यामध्ये शरीराच्या भागाची संपूर्ण शरीराच्या आत मध्ये रक्तस्राव होऊन चाळण झालेले आहे. मारण्याला शरीरावरचा तिला एवढा भाग शिल्लक राहिलेला दिसत नाही. हाल हाल करून मारल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चीड व संताप निर्माण झालेला आहे. There is no casteism in the case of the deceased Sarpanch Santosh Deshmukh. The severe torture, cruelty and brutal killing have caused anger and resentment among the people.