बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा पवनचक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली होती. यात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. बीडमधील केज तालुक्यात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. याच कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागण्यात आली. त्याप्रकरणी तिघांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वाल्मिक कराड उर्फ वाल्मिकअण्णा ( रा. परळी ), विष्णू चाटे ( रा. कौडगाव, ता. केज ), सुदर्शन घुले ( रा. टाकळी, ता. केज ) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुनील केदू शिंदे ( रा. नाशिक, सध्या बीड ) असे फिर्याद दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. Valmik Karad, a close associate of Dhananjay Munde, is suspected to be involved in the murder of Sarpanch Santosh Deshmukh.
वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि ‘राइट हॅन्ड’ समजले जातात. तर, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यावर केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू चाटे हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे केजचे तालुकाध्यक्ष आहेत.पवनचक्कीच्या कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आज एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी आज मस्साजोग गावात भेट दिली. यावेळी त्यांनी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तत्पूर्वी त्यांनी बीडचे पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांची भेट घेतली. कोणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता खून प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करा, अशा सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या.
प्रशासन कोणाच्या तरी हाताचे बाहुले बनलेले आहे. पोलिसांनी ठरवले असते, तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता, असे दानवे म्हणाले. परंतु, कानावर आलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पोलिस एकमेकांना मिळालेले आहेत, असा दावा दानवे यांनी केला. इथे काही लोकांची दादागिरी एवढी सुरू आहे की, पोलिस देखील काही करू शकत नाही, अशी स्थिती असल्याचे दानवे म्हणाले.
वाल्मिक कराड यांसारखी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाही. कुणीही येतो, दादागिरी, हम करे सो कायदा, असे सुरू आहे. यातूनच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या प्रकरणी दररोज नव नवीन खुलासे होत आहे. आता या प्रकरणाला आणखी एक मोठं वळण मिळालं आहे. या प्रकरणात आता वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. Valmik Karad, a close associate of Dhananjay Munde, is suspected to be involved in the murder of Sarpanch Santosh Deshmukh.