समग्र शिक्षा केंद्र व राज्याच्या संयुक्त 65-35 हिस्सा अनुदानावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अंतर्गत, विशेष सर्वेक्षणांतर्गत ज्या ठिकाणी मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे गळतीचे (ड्रॉप आऊट रेट) प्रमाण जास्त आहे. अशा ठिकाणी गळतीचे ड्रॉप आउट रेट तपासून जालना नंदुरबार नांदेड परभणी गडचिरोली कोल्हापूर अशा महाराष्ट्रात चाळीस ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा प्रकल्प टाईप टू पाचवी ते दहावी शाळा व वस्तीगृह मुलींसाठी व टाईप फोर नववी ते बारावी वस्तीगृह स्वरूपात मुलींसाठी या प्रकारात चालतो.Project for KGBV girls’ education is good, staff in the face of inflation and other problems
सदरील प्रकल्पांतर्गत जालना जिल्ह्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय चे जालना, बदनापूर, अंबड, घनसांगवी, मंठा, परतूर, भोकरदन अशा ठिकाणी टाईप टू व टाईप फोर हे सात युनिट चालतात. दोन्ही युनिटमध्ये 100- 100 विद्यार्थ्यांनीची सोय केल्या जाते. साधारण शंभर ते दीडशे कर्मचारी प्रकल्प चालवण्यासाठी विविध पदावर कार्यरत आहेत. टाईप टू प्रकारासाठी वार्डन मुख्याध्यापक, शिक्षक व स्वयंपाकी वाचमन इतर सहयोगी कर्मचारी तर टाईप फोर प्रकारात वार्डन वॉचमन व स्वयंपाकी व इतर सहयोगी कर्मचारी कार्यरत आहेत.
सदरील प्रकल्प चालवण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कडून महिना संपल्यानंतर ठरवून दिलेल्या शिर्षकानुसार कर्मचारी वेतनासह , निर्वाह, मेडिकल व अनुषंगिक खर्चासाठी अनुदान मिळते. वीज, दुरुस्ती देखभाल, मेडिकल साठी मर्यादित अनुदान मिळते. खर्च करताना चौकटीत बसवताना कसरत करावी लागते. तर निर्वाह खर्च महागाई तथा नेहमी कमी जास्त होणाऱ्या बाजारभाव मुळे बजेट कोलमडून जाते. परंतु अनुदान खर्च चौकटी बाहेर गेला तर प्रशासनाला उत्तर द्यावं लागतं असं एका कर्मचाऱ्यांना अनौपचारिक चर्चात सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अशी व्यथा ही त्यांनी मांडली.
सदरील प्रशासन चालवत असताना योग्य वेळी उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभाव अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सदरील मिळणाऱ्या अनुदान महागाई किती वाढली तरी चार चार पाच पाच वर्षे त्या दरामध्ये बदल होत नाही. पाच वर्षापासून 1650/- प्रति विद्यार्थी प्रमाणेच अजूनही अनुदान मिळत आहे. आमच्या समस्या निराकरण व्हाव्यात याबाबत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत समस्या व आमची व्यथा मांडणार आहोत. असे त्यांनी सांगितले.Project for KGBV girls’ education is good, staff in the face of inflation and other problems