MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. MPSC मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या ३७जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.
कधी होणार पूर्वपरिक्षा
- ३० एप्रिल
- यातही महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही २ सप्टेंबर रोजी,
- तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
अर्ज कसा करावा?
- एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आहे.
कोणत्या पदांची जाहिरात
सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी १५ जागा आहेत.राज्य कर निरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी १५९ जागा आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ३७४ जागा आहेत. दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ४९ जागा आहेत. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदासाठी ३२,०००- १,०१,६०० एवढा पगार असून यासाठी ६ जागा आहेत. तांत्रिक सहायक पदासाठी २९,२००- ९२,३०० एवढा पगार असून यासाठी १ जागा आहेत. कर सहायक पदासाठी २५,५००- ८१,१०० एवढा पगार असून यासाठी ४६८ जागा आहेत. लिपिक-टंकलेखक पदासाठी १९,९००- ६३,२०० एवढा पगार असून यासाठी ७०३४जागा आहेत.