You have to pay a thousand rupees for a cylinder
मुंबई : देशात महागाई (Inflation) उच्च स्थरावर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वांंच्याच दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे ( gas cylinder) दर वाढवण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. You have to pay a thousand rupees for a cylinder
पन्नास रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच इथून पुढे एका सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडरचे दर महागल्याने गृहिनीचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे. एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. व्यवसायिक सिलिंडर पाठपाठ आता घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.
व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ
एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. एक मेला व्यवसायिक सिलिंडरचे दर 104 रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यावेळी घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला होता. मात्र आज गॅस घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आल्याने आता एका गॅस सिलिंडरसाठी हजार रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस दरवाढीसोबतच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात देखील सातत्याने वाढ सुरूच आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
एकीकडे सीएनजी, पीएनजी आणि आता एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात तर सातत्याने वाढ सुरूच आहे. गेल्या महिन्याभरात सीएनजीचे दर तीनदा वाढवण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे गेल्या महिन्यापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली होती.
हे ही वाचा ======
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी