Bailgada sharyat |सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यत बंदी उठवली Bullock cart race सशर्त परवानगी

Bailgada sharyat |सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यत बंदी उठवली Bullock cart race सशर्त परवानगी

बैलगाडा शर्यती

Bailgada sharyat, Supreme Court lifts ban on permission Bullock cart race

मुंबई : बहुप्रतिक्षीत असा बैलगाडा शर्यतीचा दिलासादायक निकाल सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) गुरुवारी दिला. या निर्णयामुळे बैलगाडा शर्यती (Bullock cart race) पुन्हा जोमानं सुरु होतील. बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. ज्या अटी आणि शर्ती शर्यतीच्या आयोजनांमध्ये घालण्यात आल्या आहेत, त्यांची कितपत पूर्तता होते, हे येणारा काळ सांगेलच. पण एक गोष्ट यामुळे निश्चितच घडेल, अशी शक्यता आहे. बैलगाडा शर्यतींमुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला (Economy) गती मिळेल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. Bailgada sharyat, Bullock cart race

बैलगाडा शर्यतींचं आकर्षण उच्चभ्रूंच्या घोड्याच्या शर्यतींचं (Horse Race) जितकं वेड तितकंच वेड हे ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यतींसाठी पाहायला मिळतं. हे काही फक्त महाराष्ट्रातच (Maharashtra) होतं अशातला भाग नाही. महाराष्ट्रासोबत कर्नाटक (Karnataka), तामिळनाडू (Tamilnadu), केरळ (Keral), गुजरात (Gujrat), पंजाब (Punjab), हरियाणा (Hariyana) या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार आता येत्या काळाता बघायला मिळणार आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे या सर्वच राज्यातील बैलगाडा प्रेमींमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा संचारली आहे. Bailgada sharyat, Bullock cart race

मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात बैलगाडा शर्यतींचं अधिकृतपणे आता आजोजन केलं जाईल. महाराष्ट्रासोबत बैलगाडा शर्यत ही प्राचीन संस्कृती (Culture) आणि पारंपरिक प्रथेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना छकडा किंवा शंकरपट असंही संबोधलं जातं. Bailgada sharyat, Bullock cart race

आयोजन, अर्थकारण आणि आनंद! देशातील वेगवेगळ्या राज्यातील ग्रामीण भागाची वेगवेगळी ओळख बैलगाडा शर्यतींमधून दिसून येते. प्रत्येकाचं वेगळेपण फारसं नसलं, तरी आपल्या मातीचा गंध देण्याचा, ओळख जपण्याचा प्रयत्न प्रत्येकच गावातील बैलगाडा शर्यतींची आयोजक करत असतात.आपल्या देशात घोडे, बैल, कुत्रे यांचा वापर लोकोपयोगी कामांसाठी पूर्वापार चालत आलेला आहे. त्यांचा वापर करताना, त्यांचं संवर्धन आणि संगोपन करताना अनेक प्रजाती तयार होत गेल्यात. या प्रजाती जोपासल्याही गेल्या. त्यातूनच बैलगाडा शर्यती सारखी गोष्ट उदयाला आली असल्याचा नोंदी आढळतात. शेतीची कामं संपली की मनोरंजनाचं, खेळीमेळी आणि उत्साह कायम ठेवण्याचं साधन म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिलं जातं. धार्मिक यात्रा, जत्रा, आपआपल्या भागातील नेत्यांचे वाढदिवस आणि मोठे कार्यक्रम किंवा ऊरुस यामध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन होते आलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर बैलगाडा शर्यतींच्या भव्य टुर्नामेन्ट भरवल्या गेल्या, तर आश्चर्य वाटायला नको. Bailgada sharyat, Bullock cart race

ग्रामीण भागाची भरभराट करणारी शर्यत

एखादी शर्यत आली की त्या शर्यतीच्या आयोजनामागे अर्थकारणाचा एक महत्त्वाचा पैलूही असतो. ज्या गावात शयती होतात, त्या गावाच्या अर्थकारणावर थेट मोठा प्रभाव पडत असतो. शर्यतीच्या निमित्तानं लावली जात असलेली छोटी-मोठी दुकानं, बैलांना सजवण्याच्या वस्तू विकणारे व्यापारी, शेतीपयोगी वस्तू विकणारे, चहा-पाण्याची हॉटेल्स चालणारे लोक, बैलांच्या धावपट्ट्या तयार करणारे, बैलांच वाहतूक करणारे, वाजंत्री, आताच्या काळात डीजेवाले, चारा विकरणारे, असे छोटे-मोठे प्रत्येक व्यावसायिक या शर्यतीच्या अवतीभोवती जोडले जातात. त्यातून होणारी आर्थिक उलाढाल ही प्रत्येकासाठी मोलाची ठरते. मोठ्या शेतकऱ्यांकडे असलेला आर्थिक प्रवाह गरीब कामकरी लोकांकडेही यानिमित्ता प्रवाहीत होतो. जिंकणाऱ्याला रोक्ष बक्षिसासह प्रतिष्ठा आणि मान-सन्मान ही मिळतात. पशुपालकांच्या गावात ही गोष्ट अभिमानास्पद असते. आधीच्या काळात तर स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलांच्या संख्येवरुन त्या गावाची श्रीमंतीही मोजली जायची.

यातूनच आपल्या गावातील बैलगाडाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांची एकत्र येण्याची भावनाही जोपासली जाते. त्यातूनच एकोपा वाढचो. वेगवेगळ्या गावातील बैल एकत्र येतात. त्यांची जोडी करुन स्पर्धेत उतरवली जाते. या सगळ्यातून जो निर्विवाद आनंद लुटला जातो, त्याची किंमत कशातच करता येण्यासारखी नाही. Bailgada sharyat, Bullock cart race

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice