काय आहे मराठा सेवा संघ, संघाने काय काम केले ?

काय आहे मराठा सेवा संघ, संघाने काय काम केले ?

मराठा सेवा संघ हा शब्द वाचला की अनेकांना प्रश्न पडतो, ही नेमकी कसली संस्था आहे? त्यांचे काम काय आहे ? त्यांच्या माहितीसाठी हा थोडासा लेखनप्रपंच. What is Maratha Seva Sangh, what did the Sangh do?.

१ सप्टेंबर १९९० रोजी बहुजन समाजातील सर्व घटकांनी एकत्र याव या उदात्त हेतूने अ‍ॅड. पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास व चिंतन करून ‘मराठा सेवा संघाची’ Maratha Seva Sngha स्थापना अकोला येथे केली. मराठा सेवा संघ व त्या अंतर्गत ३३ कक्षांच्या माध्यमातून सर्व मराठा समाजाच्या अथक परिश्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरोगामी विचारांच सशक्त व राष्ट्रनिर्मितीकरिता बलशाली संघटन म्हणून मराठा सेवा संघ सर्वांना सुपरिचित झाला आहे.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शेकडो वर्षांपासून पुरुषप्रधान संस्कृती असतांना सुद्धा मराठा सेवा संघाने संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा मातृतीर्थ सिंदखेड राजा इथे मासाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊ सृष्टीचा भव्य दिव्य प्रकल्प हाती घेतला आणि अतिशय जलदगतीने हा प्रकल्प पूर्ण होत आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा प्रकल्प, हा मातृसत्तेचा गौरव, सन्मान फक्त मराठा सेवा संघच करू शकतो. मातृशक्तीचा प्रत्यक्ष कृतीतून सन्मान करणार जगातील एकमेव संघटन म्हणजे मराठा सेवा संघ After reading the word Maratha Seva Sangh, many people wonder, what kind of organization is this? What is their job? Here is a little writing for their information ..

१९९० सालापासुन मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार अशी ओळख धारण करणारी संस्था आहे. खरंतर मराठा सेवा संघाने Maratha Seva Sngha नेमकं कोणतं कार्य केले हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कधीही पडत नाही. परंतु समाजातील धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवणाऱ्या विघातक प्रवृत्तींनी सर्वसामान्य लोकांपर्यंत मराठा सेवा संघ आणि त्याचे वास्तविक विचार पोहोचू नयेत म्हणून त्याविषयी जी बदनामीची मोहिम राबविली, जो अपप्रचार केला, जे चुकीचे चित्र समाजासमोर उभे केले त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मराठा सेवा संघाचे उद्देश्य आणि कार्य याविषयी प्रश्न पडणे साहजिक आहे. Maratha Seva Sngha मराठा सेवा संघाच्या कार्याविषयी थोडक्यात घेतलेला हा आढावा वाचुन लोकांच्या माहितीत थोडी जरी भर पडली तर या लिखाणामागचा उद्देश साध्य झाला म्हणता येईल…

मराठा सेवा संघाने काय केले ? What did the Maratha Seva Sangh do?
“महाराष्ट्राच्या सामाजिक भुमीची नव्याने मशागत केली…
समाजाला
“जय जिजाऊ जय शिवराय”,
“एक मराठा लाख मराठा”
अशी आपुलकीची घोषवाक्यं दिली…
राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाला “जय जिजाऊ” असे अभिवादनमुल्य प्राप्त करुन देऊन लाखो लोकांना एकत्र आणले…
पूर्वी राष्ट्रमाता जिजाऊंचे कोणतेही चित्र उपलब्ध नव्हते, त्यांचे तैलचित्र बनवुन ते अधिकृत करुन राज्याच्या मंत्रालयात लावुन घेतले…
विधानसभेत शिवजयंतीच्या तारखेच्या वादावर चर्चा घडवुन १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख निश्चित करुन घेतली…
१२ जानेवारी जिजाऊजयंती सिंदखेडराजा
१२ जानेवारी हा माॅसाहेब जिजाऊंचा राष्ट्रीय जन्मोत्सव दिन! १९९० पूर्वी हा दिवस इतिहासजमा झाला होता,पण जिजाऊंच्या जन्मगावी सिंदखेड राजा येथे खेडेकर साहेबांनी जिजाऊ जन्मोत्सवाचा प्रारंभ केला आणि आज खेडोपाडी हा दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे युवक, युवती,आबालवृद्ध साजरा करतात. माॅसाहेबावर लेखन केले जात आहे.त्यांच्या चरित्राचे विविध पैलू विचारवंत आपल्या भाषणातून लेखनातून समाजापुढे ठेवू लागले आहेत. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा उत्साह १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सवादिवशी अत्युच्च बिंदूवर असतो. मराठा समाजाला त्या निमित्ताने एका नव्या सांस्कृतिक पर्वाचा लाभ झालेला आहे.सिंदखेड राजा या बुलढाण्यातील जिजाऊंच्या जन्मगावी लाखाहून लोक, शेकडो गाड्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून “जय जिजाऊ जय शिवराय” चा घोष, ऐतिहासिक स्फूर्तीदायक पोवाड्यांचे गायन हे सारे मन उल्हासित,प्रफुल्लित करणारे असते
१९ फेब्रुवारी शिवजयंती किल्ले शिवनेरी
१४ मे शंभुजयंती किल्ले पुरंदर
६ जुन शिवराज्याभिषेक किल्ले रायगड

हे उत्सव सुरु केले…
२९ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात शेतकरी दिन म्हणुन साजरा करण्यासाठी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला…
पानिपतच्या युद्धातुन वाचलेले रोड मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांचा मराठा मिलन समारोह घडवुन आणला… After reading the word Maratha Seva Sangh, many people wonder, what kind of organization is this? What is their job? Here is a little writing for their information ..

धार्मिक, जातीय विद्वेषातुन दगडं उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तके दिली आणि महाराष्ट्रातील जातीय सलोखा वाढविला
इतिहासाच्या पुनर्लेखनाची चळवळ उभा करुन इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांवर दहशत बसविली…
महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत घेऊन जाणाऱ्या लेखक, वक्ते, शाहीर, कलाकारांची मोठी फळी निर्माण केली…
लेखकांना वाचकवर्ग दिला
वक्त्यांना श्रोतावर्ग दिला
कलाकारांना प्रेक्षकवर्ग दिला
महाराष्ट्राला वैचारिकवर्ग दिला…
धार्मिक गोष्टींचा विचार करताना धर्माचा उदात्त विचार सांगणारी “शिवधर्म गाथा” दिली.
आपली नाणी, वाणी, लेखणी आणि करणी आपण आपल्याच लोकांविरोधात वापरु नये ही आचारसंहिता दिली…
युवकांना बुटाच्या पॉलिशपासुन डोक्याच्या मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय करण्याची दृष्टी दिली…
धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, प्रचारप्रसारमाध्यमसत्ता यांचे महत्व समाजाला पटवुन दिले…

अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार आणि न्युनगंड ही समाजाच्या अधोगतीची कारणे आहेत याची समाजाला जाणीव करुन दिली…
समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा आणि बुद्ध-तुकोबा-शिव-फुले-शाहू-आंबेडकर ही साखळी समजावुन सांगितली…”
मराठा सेवा संघाचे कार्य प्रत्यक्षात जितके दिसून येते, तितकेच अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांवर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव पडला आहे.
आज माझ्यासारखे जे अनेक युवक वेगवगेळ्या विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होतात, त्यासाठी मराठा सेवा संघाचा खूप मोठा आधार राहिलेला आहे. After reading the word Maratha Seva Sangh, many people wonder, what kind of organization is this? What is their job? Here is a little writing for their information ..

===================================================================================

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice