मुंबई:
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन व मुल्याकंन एका वेगळ्या धर्तीवर केले होते व त्यानुसार गुणांकन करण्यात आले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण या नुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.१. hscresult.11thadmission.org.in २. https://msbshse.co.in 3. https://hscresult.mkcl.org ४. mahresult.nic.in. 5.https://lokmat.news18.com www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
Maharashtra HSC Result 2021 link will be activated at Maharashtra HSC Board 2021 official website i.e. maharesult.nic.in 2021. Maharashtra HSC Result 2021 Date & Time is not set by the MSBSHSE. It is expected to be announced on 31th July 2021 at https://mh-hsc.ac.in & http://mahahsscboard.in. The students need to enter Seat no. & mother Name To check the result online. The Maharashtra HSC 2021 e-Marksheet 2021 will be available on different url which is mentioned in the last paragraph.
Maharashtra HSC Result 2021 Date Time : दहावीचा निकाल आठवड्यात लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली असून उद्या बारावीचा दुपारी निकाल लागणार लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना 31 जुलैपर्यंत निकालाची घोषणा करण्याचे आदेश दिले आहेत. आज बहुतांश राज्यात बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. मा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निकाल लागणे अपेक्षित आहे.
Maharashtra HSC Result 2021: यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बारावी परीक्षा रद्द करुन दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण एकत्र करुन अंतर्गत मूल्यपामनद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता बोर्डाकडे शाळांनी तयार केलेले निकाल आलेत त्यावर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. आज बारावीच्या निकालाची तारीख बोर्डाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जातील.
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिकाकालिचरण महाराज छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले. ते असे म्हणाले आता एक…
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठीच्या निवडणूक प्रचाराचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे. ही मोहीम सायंकाळी ५ वाजता थांबली. या…
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefitsबाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध आहे, ज्याचा उपयोग विविध शारीरिक विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. याच्या शेंगाचे चूर्ण…
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झालाटीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि आरसीबीचे माजी संचालक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर सध्या चर्चेचा विषय आहे. संजय बांगर…