पक्ष माझ्या बापाचा समजणाऱ्या मुंढे कन्याला का डावलले जातयं? |Modi CabinetExpansion2021
केंद्रातील मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार CabinetExpansion2021 पार पडलाय. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात नव्या ४३ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ दिली. केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार होत असताना काही दिवसापासून राज्यात मिडीया सोशलमिडीया यांच्यामध्ये संभाव्य मंत्री म्हणून काही चेहऱ्या विषयी चर्चा होतहोती त्यामध्ये नारायण राणे, भारती पवार, कपील पाटील सह हिना गावित, प्रितम मुंडे यांच्या नावाच्या जोरदार चर्चा होत्या. आपल्या नेत्यांच्या नवविस्तार मंत्रिमंडळात वर्णी लागणार म्हणून त्यांच्या समर्थका मध्ये उत्साह शिगेला पोहचला होता.
झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात CabinetExpansion2021 संभाव्य चर्चेत असणाऱ्या नारायण राणेंची वर्णी लागली असताना अचानक ध्यानीमनी नसणाऱ्या महाराष्ट्रातील वंजारी समाजातील राज्य सभेचे खासदार डॉ भागवत कराड यांची वर्णी लागली आणी पक्षश्रेठीने महाराष्ट्रासह वंजारी समाजाला आश्चर्यचा धक्का दिला. यामुळे पंकजाताई समर्थकामध्ये नाराजी पसरली असून कार्यकर्ताचा उत्साह खचला. या विषयी सोशलमिडीयात समर्थकांनी सोशलमिडीयात नाराजीचा सुर आवळल्याचे पहायला मिळत आहे.
पक्ष माझ्या बापाचा आहे असे जाहीर बोलणाऱ्या मुंडे भगिनींना राज्यात MLC साठी व केंद्रात मंत्रिमंडळात खुलेआम डावलल गेलं. ज्यांची भाजप ला मोठं करण्यात हयात गेली ज्यांच्यामुळे भाजप आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलाय त्यांच्या मुलींना आज पक्षात काडीची किंमत ठेवली नाही-मग आज मुंडे साहेबांच्या शब्दाला प्रमाण मानणाऱ्या समाजाने एक विचार करायला हवा की, का पोसतोय हा भाजप आपण अशी चर्चा सोशलमिडीयात समर्थक करत आहेत.
कोण पत्ता कट करत आहे. मुंढे भगिनी गोपीनाथ मुंढेचा वारसा सक्षम, संयमीपणे पुढे नेत आहेत. मुंढेसिहेबांच्या पश्चात समाजातील जनाधार टिकून ठेवलेला आहे. असे असताना राज्य क्षव केंद्रस्तरिय पक्षनेतृत्व जाणीव पुर्वक दोन्ही मुंढे कन्या डावलून समाजातील इतर जनाधार नसलेल्या किंवा गोपीनाथ मुंढे साहेबांनी राजकारणात उभे केलेल्या लोकांना पुढे आणत आहे. यावरून मुंढे भगिनी राजकीय प्रवासात अडचणी निर्माण करून गोपीनाथ मुंढे यांच्या वारसांना राजकारणात संपविण्याचे षंडयंत्र तर नाही ना अशी चर्चा सोशलमिडीयावर समाजाची दिसून येत आहे.CabinetExpansion2021
हे ही वाचा ————
- बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा ‘सुरज चव्हाण’ स्टाइल अंडरडॉग: जालन्याचा छोटा डॉन प्रभू शेळके! थॅलेसेमियाशी झुंज देत मेहनतीने घरात दाखलप्रभू शेळके हा बिग बॉस मराठी सीझन ६ मधील एक अत्यंत
- स्टार्सचा महासंग्राम! बिग बॉस ६ “रितेश देशमुखचा लयभारी अंदाज! १७ सुपरस्टार्स घरात, कोण जिंकेल १ कोटी?बिग बॉस मराठी ही मराठी भाषेतील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शो
- सावधान! WhatsApp APK स्कॅम: एक क्लिक आणि बँक खाते रिकामे – महाराष्ट्रात वाढत्या तक्रारीप्रिय वाचकांनो, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर विविध नावाने APK File” प्राप्त होतात
- मुंबईत ठाकरेच पाहिजेत ? ठाकरे बंधू एकत्र येण्याविषय मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य ऐन महानगर पालिका निवडणुकीत चर्चेतमुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
- गोड साखरेची कडू कहानी पत्नीच्या फेसबुक लाईव्ह चालू असताना नवऱ्याचा दुर्दैवी अंत निष्ठुर नियतीने 3 चिमुकल्यांचा बाप तर वृद्ध मायबापाचा आधार हिरावला…“टिचभर पोटाच्या खळगीची भिषण करुण कहानीचा दुर्दैवी अंत” The bitter story

