‘‘ कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरण हेच सर्वांत प्रभावी शस्त्र असून लस घेणाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत. सर्व नागरिकांना लस मिळावी म्हणून फ्रंटलाईन वर्कर खूप मेहनत घेत आहेत.’’ अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. केंद्र सरकारने अठरा वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करायला सुरुवात केल्याने या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढली आहे. सोमवारी एकाच दिवशी 85,15,765 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. (Record of vaccination in the country Vaccinate 85 lakh people in a single day)
केंद्र सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे दिली. शहा यांनी येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय भवनातील लसीकरण केंद्रांना भेट दिली. गुजरातचे मुख्यमंत्री नितीन पटेलही यावेळी त्यांच्यासोबत होते. या भेटीनंतर शहा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील नागरिकांचे विनामूल्य लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली या लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. प्रत्येकाचे लसीकरण करून आम्ही हे ध्येय लवकर साध्य करू.
केंद्र सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात विनामूल्य लसीकरणाचा निर्णय ही मोठी बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. शहा यांनी विनामूल्य लसीकरणाच्या या निर्णयाबद्दल मोदी यांचे कौतुकही केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून देशभरात सोमवारपासून विनामूल्य लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली.
हे ही वाचा —————————————————————-
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Kalmegh Ayurvedic Plant| कलमेघ बहुउद्देशीय आयुर्वेदिक वनस्पतीची ओळख; यकृत, अँटिऑक्सिडेंट, पचनशक्ती
- उन्हाळ्यात हाडांच्या मजबूती साठी हे पदार्थ खा भरपूर कॅल्शियम मिळवा
- Kalmegh | काळमेघ ओळख एका बहुपयोगी आयुर्वेदिक वनस्पतीची ; याकृत, अँटिऑक्सिडेंट, पाचनशक्ती