पुणे : सततच्या प्रतिक्षेनंतर मोसमी पाऊस अखेर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दाखल झाला आहे. आज रविवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अलिबाग, सातारा, पुणे भागात मोसमी पाऊस पोचला. देशात पश्चिम बंगाल, ईशान्य भारतातील सिक्कीमपर्यत हा पाऊस पोचला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. दरम्याण चोवीस तासाच महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पावसाळा सुरु झाला की साधारण 7 जुनला पाऊस सुरुच होतो असा जुन्या काळात कयास होता. त्याच अनुषंगा खरिपातील पेरणीची तयारी केली जायची. मोसमी पावसाचा हा सामान्य जाणकार शेतकऱ्यांचा अंदाजही खरा ठरायचा. आलिकडच्या काही वर्षात मात्र हे अंदाज चुकु लागले आहेत.
यावर्षी मोसमी पाऊस २१ मे रोजी अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले होते. त्यानंतर नियमित वेळेच्या (१ जून) दोन दिवस उशिराने दक्षिण केरळात दाखल झाला. अरबी समुद्राकडून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली.
नेहमीपेक्षा चार दिवस आधीच म्हणजे आज रविवारी पुण्यात हजेरी लावली. मुंबईत मात्र अद्यापही मॉन्सून दाखल झालेला नाही. पुण्यासह मुंबईत मॉन्सून साधारणतः १० जून रोजी दाखल होतो असा अलिकडचा अनुभव आहे, देशातही रविवारी कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम पर्यत मोसमी पाऊस पोचला आहे. मोसमी पाऊस दाखल होत असल्याच्या हवामान खात्याच्या वार्तेने शेतकरी खुश झाले आहेत. आता बहूतांश ठिकाणी पेरणीची तयारी सुरु आहे.
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळाभारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज … Read more
- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीभारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीसाठी … Read more
- संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे..सदरील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घटनेला आज 15 16 दिवस होऊनह मुख्य आरोपी अटक झालेली नाही. घटनेतील … Read more
- किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the announcement on 26th January Republic … Read more
———–