नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांचं बुधवारी रात्री उशिरा निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना नांदेड (Nanded Politics) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भोकर (Bhokar, Nanded) विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.25 ऑगस्ट, गुरुवार) दुपारी 4 वाजता गोरठा, ता. उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा…
Read More