शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणातर्गंत विविध कोर्स करण्याची संधी |CM Maha-Arogya Skills Development Training

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणातर्गंत विविध कोर्स करण्याची संधी |CM Maha-Arogya Skills Development Training

नांदेड | आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करुन रोजगाराची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातुन वैद्यकीय क्षेत्रात साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा या क्षेत्रात उपलब्ध रोजगार संधीच्या दृष्टिकोनातुन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 2021 करिता मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. Opportunity to do various courses under Chifminister Maha-Arogya Skills Development Training in Government Ayurvedic College
या अंतर्गत शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात देण्यात येणारे प्रशिक्षण कोर्स हे व्यक्तीगत आयुष्यात तसेच सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्याच्या परस्थितीत आयुर्वेद औषधी योगा चे जनमानसात वाढते महत्त्व लक्षात घेता मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणातर्गंत पुढील कोर्स असिस्टंट योगा इंन्स्ट्रक्टर- 8 वी, आयुर्वेदा आहार ॲन्ड पोशक सहायक- 10 वी, आयुर्वेदा डायटीशीयन बीएएमएस, कुपिंग थेरपी असिस्टंट- 10 वी, क्षारा कर्मा टेक्निशियन- 10 वी, पंचकर्मा टेक्निशियन- 12 वी, योगा थेरपी असिस्टंट- 12 वी, योगा वेलनेस ट्रेनर- 12 वी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. हे कोर्स करण्याची संधी आहे. Opportunity to do various courses under Chifminister Maha-Arogya Skills Development Training in Government Ayurvedic College

सदरील प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्रामार्फत संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना केंद्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. Skills India त्यामुळे या प्रमाणपत्राचा फायदा त्यांना व्यक्तीगत आयुष्यात विविध बाबीसाठी मिळेल. यासाठी जिल्ह्यातील युवक युवतीने या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. Opportunity to do various courses under Chifminister Maha-Arogya Skills Development Training in Government Ayurvedic College

वरील कोर्स व्यतिरिक्त इतर ही कोर्स प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, वैद्यकीय संस्था तसेच 20 पेक्षा अधिक बेडची सोय असणारी रुग्णालये या कार्यक्रमांतर्गत व्यवसायिक प्रशिक्षण संस्था म्हणुन सुचिबद्ध होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत. हे संपुर्ण प्रशिक्षण उमेदवार, लाभार्थ्यांना पूर्णपणे नि:शुल्क असून सुचिबद्ध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाचे शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल. Opportunity to do various courses under Chifminister Maha-Arogya Skills Development Training in Government Ayurvedic College

याबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice