पीकस्पर्धा – खरिपात चांगले दर्जेदार उत्पादन घ्या, अन सरकारचे भरघोष बक्षीसही मिळवा
पुणे, : आपल्याच शेतात चांगले उत्पादन घ्या अन सरकारच्या कृषी विभागाचे बक्षीसही मिळवा. कृषी खात्याने यावर्षीच्या खरिपासाठी पीकस्पर्धा जाहीर केलीय. त्यात सहभागी व्हायचे असेल तर मुग व उडीदासाठी दि. ३१ जुलै पूर्वी व इतर खरीप पिकांसाठी दि. ३१ ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करावा लागणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सहभागाची कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी अपेक्षा केली आहे.
शेतकऱयांनी चांगले पीक उत्पादन घ्यावी, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांनी चांगले प्रयोग करावेत आणि अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने यंदा खरिप हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजीत केली आहे. पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येत आहे.
स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण ११ पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्यापिकाखाली किमान १० गुंढे क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करणार आहेत.
स्पर्धेत सहभागानंतर बक्षीसपात्र शेतकऱ्यांना
त्या-त्या तालुक्यात पीक कापणी प्रयोगासाठी सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४ स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. या स्पर्धेतील सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी गटात प्रत्येकी तीन बक्षीसे दिली जातील. तालुका पातळीवर प्रथम पाच हजार, द्वितीय तीन व तृतीय दोन हजार, जिल्हा पातळीवर प्रथम दहा, द्वितीय सात व तृतीय पाच हजार, विभाग पातळीवर प्रथम २५, द्वितीय २० व तृतीय १५ हजार तसेच राज्य पातळीवर प्रथम ५० हजार, द्वितीय ४० व तृतीय ३० हजार रुपये बक्षीस आहे.
हे ही वाचा
- महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा: SIT ची स्थापनामुंबई, 31 जुलै 2025: बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्येप्रकरणी तब्बल 18 महिन्यांनंतरही आरोपींना अटक न
- या कारणामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्ततामुंबई, 31 जुलै 2025: मालेगाव येथील 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कोर्टाने सर्व सात आरोपींची निर्दोष
- सैय्यारा (2025): प्रेम, वेदना आणि विस्मरणाच्या प्रवासाची संगीतमय कथाSaiyyaraa (2025): A musical tale of a journey of love, pain and oblivion मुंबई | 2025: प्रतिनिधी | (न्यूज महाराष्ट्र
- 9 वे पर्यावरण संमेलन 2025 ला नांदेड जिल्हाधिकारी यांची उपस्थिती लाभणार; जिल्हाधिकारी यांना पर्यावरण मंडळाच्या वतीने निमंत्रणNanded District Collector To Attend 9th Environment Conference 2025 Invited By Nisarga Samajik Paryavaran Nivaran Mandal माहुर प्रतिनिधी:- नांदेड जिल्हा