मेगा नौकर भरती होणार, तातडीने रिक्त पदाबाबत माहीती संकलीत करणयाचे निर्देश | Recruitment vacancies immediately
Online Team :- राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यात येणार Recruitment vacancies immediately in Maharashtra Goverment असून त्यासाठी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. गट ‘अ’, गट ‘ब’ व गट ‘क’ श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देणार आहेत. एमपीएससीमार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष २०१८ पासूनच्या एकूण १५ हजार ५११ पदांच्या भरतीस मान्यता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी काल विधीमंडळात केली होती. त्यानंतर त्यांनी आज हे आदेश दिले. (deputy chief minister ajit pawar ask to fill important vacancies immediately)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत, जिल्हा परिषदेतील उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांची पदे बऱ्याच काळापासून रिक्त असल्याची माहिती पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सर्वच विभागांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी Recruitment vacancies immediately in Maharashtra Goverment उपमुख्यमंत्र्यांनी रिक्त पदांची माहिती संकलित करण्यास सांगितले आहे.
कोकण विभागात, विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काम करण्यास उत्सुक नसल्याने बहुतांश अधिकारी तिथून बदली करुन घेतात. त्यामुळे कोकणातील अनेक पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात काम करण्यास उत्सुक असलेल्या अधिकाऱ्यांची पसंती घेऊन त्यांची प्राधान्याने नियुक्त करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया गतिमान करण्यासाठी, एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत भरण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे. २०१८ पासून एमपीएससीद्वारे भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील गट ‘अ’च्या ४ हजार ४१७, गट ‘ब’ च्या ८ हजार ३१ आणि गट ‘क’ च्या ३ हजार ६३ अशा तीन संवर्गातील एकूण १५ हजार ५११ रिक्त पदे भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. Recruitment vacancies immediately in Maharashtra Goverment.
हे ही वाचा ————
- एका भारतीय नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये 16 जुलैला फाशी, भारत सरकार आणि कुटुंबाची शेवटची धडपडकेरळच्या पालक्कड जिल्ह्यातील निमिषा प्रिया, एक 37 वर्षीय भारतीय नर्स, येमेनमधील सना येथील तुरुंगात 2017 मध्ये
- विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीनी काय मागितलेपंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी
- पन्नास वर्षातील सर्वात मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम: शहरातील रस्त्यांना मोकळा श्वासछत्रपती संभाजीनगर, ज्याला मराठवाड्याची सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जाते, हे शहर ऐतिहासिक वारसा आणि
- आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षण क्षेत्रावर गंभीर आरोप; घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणीन्यूज महाराष्ट्र व्हाईस: मुंबई, दि. २ जुलै २०२५: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार
- बीडमधील उमाकिरणचे अल्पवयीन विद्यार्थिनीवर वाईट किरण लैंगिक छळ विनयभंग, पालकांमध्ये संतापबीड, महाराष्ट्र: बीडमधील उमाकिरण खासगी शिकवणी क्लासेस (Umakiran Coaching Classes) सध्या एका गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आहे.