Panchayat Samiti Chairman | माहुर पंचायत समिती पदी काँग्रेसच्या सौ अनिता कदम यांची बिनविरोध निवड

Panchayat Samiti Chairman | माहुर पंचायत समिती पदी काँग्रेसच्या सौ अनिता कदम यांची बिनविरोध निवड

नांदेड | माहूर पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस दोन ना.मा.प्र. प्रवर्गाच्या सदस्यात पक्षांतर्गत सव्वा वर्षाच्या वाटाघाटीझाल्याने सव्वा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सभापती पदाचा सौ. निलाबाई तुळशीराम राठोड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या माहूर पंचायत समितीच्या सभापती पदाची दि.१५ जून रोजी दुपारी ३:०० वा. माहूर पं.स.च्या वसंतराव नाईक सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सौ.अनिता विश्वनाथ कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार हे होते तर माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर सहाय्यक गटविकास अधिकारी आरबडवार यांनी सहकार्य केले. यावेळी उपसभापती उमेश जाधव, पं.स. सदस्य नामदेवराव कातले, पं.स. सदस्या सौ.निलाबाई तुळशीराम राठोड यांची सभागृहात उपस्थितीत होती.

सभापती पदासाठी सौ.अनिता विश्वनाथ कदम यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने पीठासीन अधिकारी पुजार यांनी सभापती पदी सौ.अनिता कदम यांची निवड झाल्याचे जाहीर करून निवडीचे प्रमाणपत्र दिले.या निवडीचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

यावेळी जेष्ठ नेते नामदेवराव केशवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संजय राठोड, युवक कॉंग्रेस वैद्यकीय सहाय्यता विभागाचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे, किशन राठोड, निसार कुरेशी, विश्वनाथ कदम, जब्बार शेख, देविदास काळे, अजीम सय्यद संजय गायकवाड,आदीसह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

<

Related posts

Leave a Comment