पोस्ट कोविड कॉम्पलीकेशंस वर आयुर्वेदिक उपाय : डॉ. विश्वंबर पवार निवघेकर

कृपया पूर्ण लेख शेवट पर्यंत वाचणे

सद्य:स्थितीत कोरोना आजार बरा झाल्यानंतर रुग्णांमध्ये आढळणाऱ्या आरोग्य विषयक कॉम्पलीकेशंस ही एक समस्या बनली आहे. औषधोपचारानंतर तंदुरुस्त झालेला रुग्ण दवाखान्यातून घरी आल्यावर त्याच्या शारिरीक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम आढळून येत आहेत आणि विविध प्रकारची लक्षणे उत्पन्न होत आहेत. विशेषतः ज्या रुग्णाचा सिटी स्कोर हा जास्त होता किंवा रक्तातील डी-डायमर, सीआरपी इ.चे प्रमाण वाढलेले होते, शरीरातील ऑक्सिजन लेवल कमी झालेली होती अथवा ज्या रुग्णाला जास्त दिवस हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते आणि जास्त प्रमाणात ऑक्सिजन देण्याची गरज भासली होती तसेच ज्यांना आयसीयू मध्ये भारती करावे लागले होते, एनआयव्ही किंवा व्हेंटीलेटर ची गरज पडली होती, त्याच बरोबर ज्या रुग्णाचे वय जास्त आहे तसेच बिपी, शुगर, थॉयराइड, दमा इ. व्याधी आहेत अश्या रुग्णामध्ये कोरोना तून पूर्णपणे बरे झाल्यावर विविध प्रकारची लक्षणे उद्भवत आहेत.

News Maharashtra Voice

त्यातील काही रुग्णांना थकवा जाणवणे, हात-पाय गळून जाने, दम लागणे, अंग दुखणे, शरीरातील ऑक्सिजन लेवल थोडी कमी असणे, भूक न लागणे किंवा भूक लागली तरी काही खाण्याची इच्छा न होणे, तोंडाला चव नसणे, पोटात गॅस होणे, पोट जड वाटणे, संडास साफ न होणे, अधून मधून बारीक ताप येणे, खोकला येणे, छातीत दु:खने, धडधड करणे, जीव घाबरणे, कुठेच मन न लागणे, भीती वाटणे, मूड फ्रेश न राहणे, मनामध्ये नकारात्मक विचार येणे, झोप न लागणे, चिडचिड होणे, काही कोणी बोलले तर सहन न होणे-तेव्हाच राग येणे, घरचे मंडळी किंवा डॉक्टर मला इवढा त्रास होत आहे तरी माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत असे वाटणे, श्वाश घेण्यास त्रास होणे, पूर्ण श्वासोच्छवासाची प्रक्रिया होत नाही अशी भावना होणे श्वासोच्छवास करण्यास फार कष्ट लागत आहेत असे वाटणे,तसेच जेवण कारतेवेळास दम लागणे तसेच लैंगिक दौर्बल्य जाणवणे इ. प्रकारचे लक्षणे रुग्णाच्या प्रकृती नुसार कमी अधिक प्रमाणात आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

वरील प्रकारच्या शारीरिक व मानसिक लक्षणाचा व आयुर्वेदात वर्णिलेल्या धातूक्षयाची लक्षणे विशेषतः ओजक्षय व शुक्रक्षय यांच्या लक्षनामध्ये साधर्म्य आहे. म्हणून पोस्ट कोविड रुग्णामध्ये धातूक्षयाची, शुक्रक्षयाची व ओजक्षयाची चिकित्सा केली तर पोस्ट कोविड पेशंटला फायदा होतो. श्वासकास चिंतामणी, रजराज रस, भ्रतवात चिंतामणी, सुवर्णमालती वसंत, वसंत कुसुमाकर रस, सुवर्ण सुतशेखर सिद्ध मकरध्वज, मुसळी, अश्वगंधा, शतावरी, बला, जेष्टमध कौंजबीज इ. औषधींचा रुग्णाची प्रकृती, अग्नीचा व लक्षणाचा विचार करून करावे.

तसेच पोस्ट कोविड रुग्ण मानसिक दडपनाखाली असतो त्यामुळे त्यांचे मनोधैर्य किंवा मनोबल कमी होते. ते भयभीत व चिंतीत होतात आणि आपल्या आजाराविषयी जास्त काळजी करतात. माझा आजार कधी कमी होणार, पूर्ण कमी होणार कि नाही अथवा काही कमी जास्त होईल का? असे एक ना अनेक प्रसन्न त्याच्या मनात येत असतात म्हणून अश्या रुग्णामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेली सत्त्वा जय चिकित्सा महत्वाची आहे.

तसेच व्याधी झाल्यामुळे ज्या अवयवामध्ये विकृती किंवा झीज झालेली असते किंवा खवैगुण्य निर्माण झालेले असते अश्या रुग्णामधील झीज भरून काढण्यासाठी व त्या अवयवाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व व्याधी पुन्हा न होण्यासाठी रसायन चिकित्सा सांगितली आहे. कोरोणा हा प्राणवह स्त्रोतसाची व्याधी आहे. त्यामुळे प्राणवाह स्त्रोतसावर उपयुक्त अशी रसायन चिकित्सा वापरावी. अभ्रक, टंकन, रससिंदुर, प्रवाळ, गुडूची घण, अडुळसा घण, तुलसी, शितोपलादि, तालीसादि, चवनप्राश, हरितकी रसायन इ. चा वापर करावा.

सबंधित रुग्णाची शुक्रक्षय, ओजक्षय, सत्वाजय चिकित्सा किंवा रसायन चिकित्सा करतेवेळेस जठराग्नी व धातूअग्नीचा विचार करून दीपन- पाचन – अनुलोमन चिकित्सा करावी. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पुढील औषधीचा वापर करावा. त्रिफळा, त्रिकटू, हिंगवाष्टक चूर्ण, लवणभास्कर चूर्ण, आयुपथ्यकर चूर्ण, चित्रक वटी, शंखवटी इ.

कोरोनाच्या चिकित्सेमध्ये वापरण्यात आलेल्या इंजेक्शन औषधीमुळे रक्तातील उष्णता वाढते त्याचबरोबर प्रोटिन्स युक्त आहार म्हणून अंडे, मटन, मासे, चिकन, तळलेले मसाल्याचे इ. प्रकारचा आहार घेण्याचे सुचविल्यामुळे रक्तातील शरीरातील उष्णता वाढून तसेच शेरीराची हालचाल नसल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे संडास साफ होत नाही त्यामुळे मुळव्याध व फिशर अशाप्रकारचा आजार होत आहे. त्यासाठी अर्शकुठार, त्रिफळा, अभयारिष्ट, काकांयण, मुडूची, तक्रारिष्ट इ. औषधीचा वापर करावा व आहारामध्ये बदल करून लघु आणि सात्विक आहार घ्यावा.

ज्या रुग्णांना बऱ्याच दिवसापासून शुगर व बिपी चा त्रास आहे. बीपी व शुगर कंट्रोल मध्ये नसतील व त्यांचे वय जास्त आहे. कोरोनामुळे जास्त दिवस दवाखान्या मध्ये राहिले आहेत. आयसीयु ची गरज पडली आहे. अश्या रुग्णामध्ये मज्ज्याधातूची विकृती होऊन त्या रुग्णाची प्रतिकार शक्ती जास्त प्रमाणात कमी होऊन mucormycosis हा भयंकर आजार होत आहे.

अशाप्रकारे पोस्ट कोव्हीड रुग्णाची आयुर्वेद पद्धतीने दसविध परीक्षा करुन दोष, धातू, मल व अग्नी यांचा विचार करुन ज्वर चिकित्सेचा आधार घेऊन धातुक्षयाची चिकित्सा, रसायन चिकित्सा, सत्वाजय चिकित्सा, अग्नी चिकित्सा व पंचकर्म काही आहाराचे नियम इ. उपचार केल्यास पोस्ट कोव्हीड रुग्ण हे पूर्णपणे लवकरात लवकर बरे होतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही असा आमचा अनेक रुग्णावर उपचार केल्याचा अनुभव आहे. म्हणून पोस्ट कोव्हीड रुग्णाला जर काही त्रास होत असल्यास त्यांनी आयुर्वेदिक उपचार करावा त्यांना त्यापासून नकीच दिलास मिळेल.

त्याच बरोबर आणखी एक गोष्ट covid उपचारामुळे व पोस्ट covid कॉम्प्लिकेशन मुळे रुग्ण व नातेवाईक हे शारीरिक मसनसिक व आर्थिक दृष्ट्या कमजोर किंवा हतबल झाले आहेत
त्यामुळे घरातील वातावरण हे अस्थिर झाले आहे त्यामुळे एकमेकांवर राग राग करणे चिड चिड संताप करणे नकारात्मक विचार किंवा चर्चा करणे किंवा परिस्थितीला दोष देने इ प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत एकमेकांना समजुन हेने परिस्थितीला दोष न देता सकारात्मक विचार करणे कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते ती बदलणार आहे आणि आपण covid च्या संकटातून बाहेर पडू असा विश्वसाने वावरणे अशा मानसिकतेचा फायदा कॉम्प्लिकेशन कमी होणास होतो

डॉ. विश्वंबर पवार
निवघेकर
निवघेकर आयुर्वेद हॉस्पिटल,
डॉक्टर्स लाईन, नांदेड
संपर्क : 9881166777

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice