“ते” खेडेकर ते “हे”खेडेकर ; विस्मयकारक प्रवास ! – ब्रह्मा चट्टे

“ते” खेडेकर ते “हे”खेडेकर ; विस्मयकारक प्रवास ! – ब्रह्मा चट्टे

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकिय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची भूमिका मांडली. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकरांनी “मराठा मार्ग” या मासिकांमध्ये संपादकिय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी राजकीय भूमिकेबाबत उहापोह केला आहे. अर्थातच महाराष्ट्रात या भूमिकेने खळबळ माजली नसती तर नवल वाटले असते. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि पुरुषोत्तम खेडेकर यांबाबत महाराष्ट्रामध्ये नव्याने कोणाला ओळख करून द्यायची गरज नाही. मराठ्यांचे मन, मेंदू, मस्तक, मनगट ज्यांनी एका विधायक विचारधारेकडे वळवले ती संघटना म्हणजे मराठा सेवा संघ !1…

Read More

मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा : संभाजी ब्रिगेड

मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा : संभाजी ब्रिगेड

औरंगाबाद : मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही. असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते व आरक्षणाचे अभ्यासक डॉ.शिवानंद भानुसे यांनी औरंगाबाद येथे १३ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.आणि असे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना महाराष्ट्रातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत, छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त, १४ मे रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने एकाच वेळी देण्यात येणार असल्याचे सांगितले डॉ.शिवानंद भानुसे पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एस.इ.बी.सी. वर्गातील आरक्षण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हा निकाल अतिशय दुर्दैवी व मराठा समाजावर सर्वार्थाने अन्याय करणारा आहे.…

Read More