कोलॅटरल डॅमेज म्हणजे अनुषंगिक हानी. शत्रुसैनिकांवर हल्ला केला असताना कधी कधी सैनिक नसलेल्यांची देखील हत्या होते, त्याला अनुषंगिक हानी असं म्हणतात. म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी या दोन जपानी शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले आणि तिथले लाखो रहिवासी ठार झाले, जे वाचले ते कायमचे जायबंदी झाले आणि तिथल्या नंतरच्या पिढ्यासुद्धा व्यंग असलेल्या निपजल्या. पण अणुबॉम्ब टाकल्यावर जपानने तात्काळ शरणागती जाहीर केली आणि दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं. एक महायुद्ध संपवण्यासाठी, म्हणजेच ते चालू राहून पुढे होणारी हानी टाळण्यासाठी अणुबॉम्ब टाकावे लागले. त्यात अपरिहार्यपणे काही निष्पाप जिवांना शिक्षा झाली. त्या शिक्षेला म्हणायचं कोलॅटरल डॅमेज.…
Read More