लाल महालात लावणी रील शूटिंग; शिवप्रमी आक्रमक, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी
पुणे : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पुनित झालेल्या पुण्यनगरीतील लाल महालात लावणीचं शुटिंग झालंय. दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी थिरकताना दिसत आहे. महालातील मध्यवर्ती ठिकाणी संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करत असल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे. या साऱ्या प्रकारावर शिवप्रेमीनी तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. … Read more