मराठानो राजकीय पक्षांच्या चिथावणाला बळी पडू नका. मराठा आरक्षण राजकीय भांडवलाचा विषय नाही. आ.शशिकांत शिंदे.

मी मराठा आहे का? हे मराठा समाजाचे राजकीय भांडवल करणाऱ्या पुढार्यांनी विचारू नये. मराठा हा विचारांशी एकनिष्ठ असतो व मी निष्ठावान मराठा आहे” काल राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावर हल्ला झाला, यापूर्वी देखील दोन वेळा हल्ला झाला होता. ज्यावेळी मी पक्ष कार्यालयात गेलो त्यावेळी हा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी केला असं मला समजलं. त्यात काही प्रमाणात तथ्य देखील होते. त्यानंतर हल्लेखोरांची जी नावे मला समजली त्या दोन मुलांच्या घरी जाऊन मी त्यांच्या कुटुंबियांना समजावलं आणि जर ती मुले मला भेटली असती तर त्यांचंही म्हणणं मी एकूण घेतलं असत व भावना समजावून घेतल्या असत्या.…

Read More