Sharad Pawar Corona Positive
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार Sharad Pawar यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला करोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. Sharad Pawar Corona Positive
करोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणीदौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शरद पवार हे सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये असल्याचे समजते. Sharad Pawar Corona Positive
गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत करोना परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार मैदानात उतरताना दिसले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य सचिवांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी करोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर बराच काळापासूनच सुरु असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठीही शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सोबत घेऊन एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. याशिवाय, शरद पवार राज्यातील करोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कातही होते. Sharad Pawar Corona Positive
===========
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी